नागपूर : नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून, आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू झाली आहे. रेशमबाग येथील कवीवर्य सुरेश भट सभागृहात मंगळवारपासून ही सोडत पार पडत आहे. यामध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग तसेच सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित केले जात आहे.
या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक १९ या दोन्ही प्रभागांमध्ये ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) यांच्यासाठी प्रत्येकी दोन जागा राखीव झाल्या आहेत. या निर्णयामुळे ओबीसी समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींनाही यामुळे चालना मिळाली आहे.
महानगरपालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आरक्षण सोडतीनुसार सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना या प्रारूपाबाबत आपले मत, सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजेपर्यंतची मुदत दिली आहे.
नागरिकांनी आपल्या हरकती किंवा सूचना महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात प्रत्यक्ष सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाईल.
सोडतीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या या प्रारूपावर लक्ष केंद्रित केले असून, आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीच्या या प्रक्रियेमुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगत आता वाढण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारण महिला या वर्गांसाठी आरक्षण निश्चित केले जात आहे. या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक १५ आणि प्रभाग क्रमांक १९ या दोन्ही प्रभागांमध्ये ओबीसी (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) यांच्यासाठी प्रत्येकी दोन जागा राखीव झाल्या आहेत. या निर्णयामुळे ओबीसी समाजात समाधान व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर राजकीय हालचालींनाही यामुळे चालना मिळाली आहे. महानगरपालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, आरक्षणाबाबतच्या हरकती व सूचना मागविण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. आरक्षण सोडतीनुसार सोमवार, १७ नोव्हेंबर २०२५ रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना या प्रारूपाबाबत आपले मत, सूचना किंवा हरकती सादर करण्यासाठी १७ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दुपारी ३.०० वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. नागरिकांनी आपल्या हरकती किंवा सूचना महानगरपालिका मुख्यालय, निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाच्या मुख्यालयात प्रत्यक्ष सादर कराव्यात, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम आरक्षण यादी प्रसिद्ध केली जाईल. सोडतीमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विविध राजकीय पक्षांनी आरक्षणाच्या या प्रारूपावर लक्ष केंद्रित केले असून, आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आरक्षण सोडतीच्या या प्रक्रियेमुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रंगत आता वाढण्याची शक्यता आहे.
