नागपूर : बहुप्रतिक्षित महापालिकेची प्रभाग रचना शनिवारी अखेर सकाळी संकेतस्थळावर जाहीर झाली. या संदर्भातील अधिकृत कार्यक्रम दुपारी असला तरी प्रभाग रचनेचे प्रारुप जाहीर झाल्याने त्यावर चर्चा सुरू झाली आहे. मोठे-मोठे प्रभाग करण्यात आले आहे. तसेच काही प्रभाग लोकसंख्येच्या आधारावर लहानही आहेत. कोणते प्रभाग मोठे आणि कोणते लहान याबाबत जाणून घेणे महत्वाचे आहे.
नागपूर शहरात एकूण ३८ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात चार वॉर्डचा समावेश आहे, पक्त एका प्रभागात तीन वॉर्ड असणारआहेत, शहराची एकूण लोकसंख्या २४ लाखांवर आहे, प्रभाग रचनेचा मुख्य आधार हा लोकसंख्याच आहे, साधारणपणे साठ हजार ते सत्तर हजार लोकसंख्या असलेला एक प्रभाग आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये सर्वाधिक म्हणजे ७१ हजार १८७ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक ३८ मध्ये असून तेथे ४७ हजार २१६ मतदार आहेत.
कसा आहे सर्वात मोठा प्रभाग १६
प्रभाग १७ ची व्याप्ती मोठी आहे. धंतोली पोलीस ठाण्यापासून सुरू होणाऱ्या या प्रभागात तकिया, काँग्रेस नगर, अजनी रेल्वे स्टेशन , डॉक्टर कॉलनी, वैनगंगानगर, मध्यवर्ती कारागृह परिसर, गौरक्षण, धंतोलीचा काही भाग, चुनाभट्टी, पूर्व समर्थनगर, पश्चिम समर्थनगर, हिंदुस्थान कॉलनी, शांतीनगर, गजानन नगर, अजनी वसाहत, छत्रपतीनगर, पंचदीपनगर, मेहर कॉलनी, उज्वलनगर,कुर्वेनगर, समलवाडाव स्ती, राहुलनगर, मुळिक कॉम्पलेक्ष देवनगर, एलआयसी कॉलनी, झोपडपट्टी आदीचा त्यातसमावेश होतो. उƫरेकडे हा प्रभाग व्हीही. एन. आय. टी. गेट समोरील अ्भ्यंकरनगर चौकापासून पूर्वेकडे सेंट्रल बाजारमार्गाने वर्धामार्गावरील जनता चौकापर्यत पुढे उत्तरेकडे विजयानंद सोसायटी समोरील टी-पॉईन्ट पर्यंत नंतर पूर्वेकडे डॉ.एन. बी. खरे मार्गेने दीनानाथ हायस्कूल टी पॉईन्ट पर्यंत , पुढे धंतोली पोलीस ठाण्यापर्यंत ,हा प्रभाग आहे.
सर्वात लहान प्रभाग
सर्वात लहान प्रभाग ३८ची सुरूवात अंबाझरी तलाव ओव्होरफ्लोपासून सुभाषनगर टी पॉईन्टपर्यत नंतर पुढे जयताळा रोडने जुन्या रेल्वे क्रॉसिंगपर्यत . त्याला समांतर मार्गाने भांगे विहार, विमानतळाच्याि भिंतीपर्यंत शिवणगाव रोडने कलकुही वाय पॉईन्ट पर्यत.व्याप्ती आहे.