नेत्यांचे नातेवाईक, सर्व पक्षांकडून गुंडांना देण्यात आलेली उमेदवारी आणि संघ स्वयंसेवकांच्या बंडखोरीमुळे गाजू लागलेल्या नागपूर महापालिकेच्या निवडणुकीतील कोटय़धीश उमेदवार लक्षवेधी ठरणार आहेत. १ कोटी ते २५ कोटींची मालमत्ता असलेल्या उमेदवारांचा समावेश यात आहे.

निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या संपत्तीच्या विवरणानुसार सर्वाधिक २१ कोटी रुपयांची मालमत्ता भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या परिणीती फुके यांनी दाखवलेली आहे.

आमदार परिणय फुके यांच्या त्या पत्नी आहेत. फुके यांचा कंत्राटादाराचा व्यवसाय आहे. त्याच्या खालोखाल काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गुडधे यांची चल आणि अचल संपत्ती १८.७५ कोटींची आहे. या निवडणुकीत बिल्डर, उद्योजक, हॉटेल व्यवसायिक, डॉक्टर, कंत्राटदार, अभियंते नशीब अजमावत आहेत. भाजपच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक १५ मधून निवडणूक लढत असलेल्या रुपा रॉय यांची संपत्ती १३ कोटी रुपयांची आहे.

भाजपचे विक्की कुकरेजा यांची चल आणि अचल संपत्ती १० कोटी ३६ लाख रुपयांची आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची संपत्ती ५ कोटी २० लाख रुपयांची आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. दिलीप दिवे यांची संपत्ती ११ कोटी ७३ लाख आहे. काँग्रसेचे उमेदवार प्रफुल गुडधे यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे विजय राऊत विजय राऊत १४ कोटी ३७ लाख रुपये आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांची संपत्ती ३ कोटी ५० लाख रुपये आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या शपथपत्रावर नजर टाकल्यास भाजपकडे सर्वाधिक कोटय़धीश उमेदवार असल्याचे दिसून येते.

नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर होत असलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत खर्चावरील मर्यादा वाढण्यात आली असून तेवढी रक्कम खर्च करण्याची क्षमता असलेले कोटय़धीश उमेदवार देखील महापालिकेच्या मैदानात उतरले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध माहितीनुसार आमदार परिणय फुके यांच्या पत्नी यांनी २१ कोटी रुपयांचे मिळवत दाखवलेली आहे. शहरातील बरेच कोटय़धीश निवडणूक लढवत आहे.

सर्वाधिक उमेदवार ४९

सर्वाधिक ४९ उमेदवार प्रभाग क्रमांक २ मध्ये आहेत तर तीन आणि पाचमध्ये ४५ उमेदवार आहेत. सर्वात कमी १४ उमेदवार प्रभाग ३८ आणि १६ मध्ये आहेत. सर्वात तरुण उमेदवार २५ वर्षांचा तर सर्वाधिक वय ६५ वर्षे आहे.

  • परिणीती फुके- २१ कोटी
  • प्रफुल गुडधे – १८.७५ कोटी
  • रूपा रॉय- १३ कोटी
  • विक्की कुकरेजा-१०.३० कोटी
  • मिताराम पटले- ३८ क्रमांक ७ कोटी
  • आनंद भिसीकर-३ क्रमांक १.५ कोटी
  • नवनीतसिंग तुली – ७ कोटी रुपये
  • संदीप जोशी – ३ कोटी ५० लाख
  • विकास ठाकरे -५ कोटी २० लाख
  • विजय राऊत -१४ कोटी ३७