सागर लोखंडेंचा पराभव; काँग्रेस, राष्ट्रवादीची लढतीतून माघार
नागपूर महापालिकेच्या उपमहापौरपदी रघुजीनगर प्रभागाचे भाजपचे नगरसेवक सतीश होले यांची निवड झाली असून त्यांनी बहुजन समाज पक्षाचे उमेदवार सागर लोखंडे यांचा ३८ मतांनी पराभव केला.
महापालिकेतील नागपूर विकास आघाडीचे संख्याबळ बघता होले यांचा विजय निश्चित मानला जात होता. काँग्रेसचे सुरेश जग्यासी, राष्ट्रवादी कांॅग्रेस राजू नागुलवार, बहुजन समाज पक्षाचे सागर लोखंडे आणि भाजपचे सतीश होले यांनी उपमहापौरपदसार्ठी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण होऊन मतांची विभागणी होईल, असे वाटत असताना आज सकाळी महापालिकेच्या टाऊन हॉलमध्ये जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी उपमहापौरपदाच्या निवड प्रक्रियेला प्रारंभ केल्यानंतर सुरेश जग्यासी आणि राजू नागुलवार यांनी अर्ज मागे घेऊन सागर लोखंडे यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सतीश होले आणि सागर लोखंडे यांच्यामध्ये सरळ लढत झाली. यात होले यांना ७९ तर सागर लोखंडे यांना ४१ मते पडल्याने सतीश होले यांची उपमहापौरपदी निवड झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
महापालिकेत १४५ सदस्य आहेत. २० सदस्य अनुपस्थित होते. १२५ सदस्यांपैकी ५ सदस्य हे मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उशिरा सभागृहात पोहोचल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. भारतीय जनता पक्षाचे छोटू भोयर आणि मीना चौधरी हे सदस्य अनुपस्थित होते. त्यांनी सत्तापक्ष नेत्यांना तशी सूचना दिली असल्याचे सांगण्यात आले. रवी डोळस, शिवसेनेचे गटनेते किशोर कुमेरिया, अल्का दलाल यांच्यासह काँग्रेसचे अनेक सदस्य अनुपस्थित होते. काँग्रेसचे अरुण डवरे, पुरुषोत्तम हजारे, भावना लोणारे, शिवसेनेचे बंडू तळवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये सभागृहात उशिरा पोहोचल्याने त्यांना मतदार प्रक्रियेत सहभागी होता आले नाही. होले यांना विजयी घोषित केल्यानंतर महापालिकेच्या कार्यालयाबाहेर कार्यकत्यार्ंनी भाजपचा विजय असो, सतीश होले आगे बढो, अशा घोषणा देत गुलालाची उधळण करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे, आमदार सुधाकर देशमुख, विकास कुंभारे, महापौर प्रवीण दटके, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी महापौर अनिल सोले आदी भाजप पदाधिकाऱ्यांनी होले यांचे स्वागत केले. तत्कालीन उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांना सव्वा वर्ष उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. होले यांना केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

विकासात योगदान – होले
उपमहापौरपदी निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सतीश होले म्हणाले, अपक्ष म्हणून महापालिकेची निवडणूक लढल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षाकडून कुठलेही पद मिळावे अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकून उपमहापौर म्हणून संधी दिली. महापालिका निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी असताना जबाबदारी मिळाली आहे. महापौर प्रवीण दटके आणि सत्तापक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विकासात योगदान देईल.

Thane Lok Sabha, OBC Bahujan Party candidate,
ठाणे लोकसभेच्या रिंगणात ओबीसी बहुजन पार्टीचा उमदेवार
Prakash Awade, Lok Sabha, hatkanangle,
आमदार प्रकाश आवाडे हातकणंगले लोकसभेच्या रिंगणात; पंचरंगी लढतीमुळे चुरस वाढली
Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात

‘व्हीप’चे पालन नाही!
काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि बहुजन समाज पक्षाने उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर केले असताना रविवारी रात्री काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन बसपाला समर्थन करण्याचा निर्णय घेतला आणि सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचा पक्षातर्फे व्हीप काढला. मात्र, तीनही पक्षांच्या अनेक सदस्यांनी पक्षातील गटनेत्यांच्या व्हीपचे पालन न करता अनुपस्थित राहिले. शिवसेनेचे गट नेते किशोर कुमेरिया सभागृहाकडे फिरकले नाही.