नागपूर : नागपूरच्या राजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार एका आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाइन विक्रीला काढण्यात आली आहे.राजे भोसले यांची तलवारची बनावट ही युरोपियन शैलीतील आहे. त्यावर देवनागरी लिपीने अंकित करण्यात आले असून, सोन्याने जडविलेली मूठ आहे. तसेच त्यात हिख्या विणलेल्या लोकरीची पकडदेखील आहे या तलवारीत एकेरी ब्लेड आहे. ही तलवार १२४ सेमी लांबीची आहे.न्यूयॉर्कच्या एका ब्रोकर कंपनीकडून हा लिलाव करण्यात येत आहे. संबंधित तलवार ही नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) यांची असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, संबंधित तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली याचा शोध भोसले घराण्याकडून घेण्यात येत आहे.
ऑनलाइन ब्रोकर कंपनीकडून ही तलवार विक्रीला ठेवण्यात आली आहे. संबंधित कंपनी ब्रिटिशांकडून स्थापित मल्टिनॅशनल कंपनी असली तरी याचे मुख्यालय न्यूयॉर्कला आहे. कंपनीने सात हजार ग्रेट ब्रिटन पाऊंडपासून (७.९५ लाख रुपये) लिलाव सुरू करण्यात येणार आहे. या लिलावासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे.हा प्रकार समोर भोसले आल्यानंतर घराण्यालादेखील धक्का बसला आहे. ही तलवार आमच्याकडे परत यावी यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असल्याची माहिती राजे मुधोजी भोसले यांनी दिली.
ही तलवार कंपनीपर्यंत कशी पोहोचली हे मोठे कोडेच आहे. १८५३ ते १८६४ या कालावधीत महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोसले (दुसरे) ऊर्फ (आप्पासाहेब महाराज) यांच्या नेतृत्वात मराठा विरुद्ध ब्रिटिश युद्ध झाले होते. त्याच कालावधीत ब्रिटिशांनी नागपूरकर भोसल्यांचा खजिना लुटला होता. त्यात अनेक रत्नजडित दागदागिने, शस्त्रसाठा व तलवारींची लूट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली असान अशी शक्यता आहे. याशिवाय एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही तलवार लपवून नेली असावी व कालांतराने तिची विक्री केली असावी अथवा कुणाला भेट दिली असावी. ही तलवार ऐतिहासिक शस्त्रांचे जतन करून त्यांची विक्री करणाऱ्या कंपनीकडे कशी आली हा मोठा प्रश्न आहे.
याबाबत राजे मुधोजी भोंसले म्हणतात…
इंग्लडच्या न्यु यार्क शहरात नागपूर राज्य संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (प्रथम) यांच्या ऐतिहासिक तलवारीचा लिलाव फिलीप मिसीलियर संग्रह क्रमांक ३९सी च्या संदर्भानें सोथेबी ही ब्रिटीश-स्थापित बहुराष्ट्रीय कॉर्पोरेशन करत आहे. त्या अनुषंगानें अनेकांना त्यात पत्रकार, इतिहासकार, इतिहास आभ्यासक, शिवप्रेमी व जनतेला हा प्रश्न पडला आहे की, नागपूर भोसले राज घराण्याची ही ऐतिहासिक तलवार इंग्लैंड ला कशी गेली. १८५३ ते १८६४ ला तात्कालीन महाराज श्रीमंत राजे मुधोजी महाराज भोंसले (दुसरे) उर्फ (आप्पासाहेब महाराज) च्या नेतृत्वात मराठा विरुद्ध इंग्रज (ब्रिटिश) युध्द झाले. त्याच कालावधीत इंग्रजानीं (ब्रिटिशानीं) नागपूर कर भोंसल्याचां खजीना लुटला. त्यात अनेक रत्नजडीत दागदागिनें, शस्त्रसाठा तलवारीचीं लुट करण्यात आली होती. त्या लुटीत कदाचित ही तलवार गेली आसावी आशी शक्यता आहे. दुसरी शक्यता आशी आहे की, एखाद्या ब्रिटिश अधिकाऱ्यानें ही तलवार लपुन झपुन नेली आसावी व कालातंरानें ती त्यानें विकली किंवा कोणाला भेट दिली आसावी. आता ही तलवार ऐतिहासिक शस्त्राचें जतन करणारें सोथेबीकडे आली व त्या ऐतिहासिक तलवारी चा लिलाव होऊ घातला आहे. त्याचं अनुषंगानें अनेकाचां दुसरा प्रश्न आहे की ती तलवार आमच्या कडे यावी. तश्या सुचना अनेकांच्या विविध माध्यातुन मला प्राप्त झाल्या. निश्चितचं आमचा व्यक्तिगत स्थरावर तसा प्रयत्न आहे की ती ऐतिहासिक तलवार आमच्या कडे यावी, असे राजे मुधोजी भोंसले यांनी पत्रक काढले आहे.