नागपूर : मध्यप्रदेशातील श्योपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याने तीन बछड्यांना जन्म दिला आहे. मार्च २०२३ मध्ये मादी चित्ता ‘ज्वाला’ने चार बछड्यांना जन्म दिला होता. त्यातील केवळ एकच बछडा आता जिवंत आहे. चित्ता प्रकल्पाअंतर्गत भारतात नामिबिया येथून १७ सप्टेंबर २०२२ला आठ, तर दक्षिण आफ्रिकेतून १८ फेब्रुवारी २०२३ला १२ चित्ते आणले होते. मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना सोडण्यात आले. त्यापैकी नामिबियातील मादी चित्ता ‘ज्वाला’ने २४ मार्च २०२३ला चार बछड्यांना जन्म दिला. यातील तीन बछड्यांचा अवघ्या दोन महिन्यात मृत्यू झाला.

हेही वाचा >>> नागपूर : शहराच्या या भागात १८ तास पाणी पुरवठा बंद असेल

२३ मे रोजी एक तर २५ मे रोजी दोन बछडे मृत्युमुखी पडले. तसेच सहा चित्त्यांचा देखील मृत्यू झाला. यानंतर या प्रकल्पावर टिकेची बरीच झोड उठली. यातील काही चित्ते जंगलात सोडण्याचा प्रयत्न झाला, पण या चित्त्यांनी कुनोची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना परत आणण्यात आले. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नामिबियन चित्ता ‘आशा’ने तीन बछड्यांना जन्म दिल्यामुळे या प्रकल्पाकडे पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टीने पाहीले जात आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील कुनोत जन्मलेल्या या तीन बछड्यांचे स्वागत केले आहे. चित्ता प्रकल्पाचे हे यश असल्याचे त्यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर सांगितले आहे.

हेही वाचा >>> नागपूर : महिला व बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळेंवर गुन्हा, काय आहे प्रकरण जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बछड्यांसह मृत्यू पावलेल्या नऊ चित्त्यांमुळे कुनोत केवळ १५ चित्ते होते. मात्र, या तीन बछड्यांच्या जन्मानंतर कुनोतील एकूण चित्यांची संख्या आता १८ झाली आहे.  ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्चला मूत्रपिंडाच्या आजाराने, तर ‘उदय’ या चित्त्याचा १३ एप्रिलला हृदय निकामी झाल्यामुळे आणि ‘दक्षा’ या मादीचा ९ मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला. त्यानंतर ११ जुलैला ‘तेजस’, १४ जुलैला ‘सूरज’ तर दोन ऑगस्टला ‘धात्री’ या मादी चित्त्याचा मृत्यू झाला. भारतात चित्ते आल्यानंतर त्यातील एका मादी चित्त्याने २४ मार्चला चार बछड्यांना जन्म दिला. मात्र, २३ मे रोजी एक तर २५ मे रोजी दोन बछड्यांचा मृत्यू झाला.