गोंदिया : कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर नेत्यांना आपले पद विसरून त्यांच्यात मिसळावेच लागते. असाच एक प्रकार गोंदिया जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाकरिता आले असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत घडला.

शुक्रवारी रात्री एका अभिवादन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर पटोले यांना कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गावात निघालेल्या भीम ज्योती रॅलीत ठेका धरावा लागला.

व्हिडीओ – लोकसत्ता टीम

हेही वाचा – “जत्रा शासकीय योजनांची”; प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार लाभार्थ्यांना थेट मदतीचे उद्दिष्ट, आज आरंभ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नानांनी दोन मिनिटे कार्यकर्त्यांसह डान्स केला. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पटोले यांची नाळ गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांशी जुळलेली आहे. ते वेळेनुसार दोन्ही जिल्ह्यांतील कोणताही कार्यक्रम असो, त्यात हजेरी लावतातच. शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत केलेला डान्स चर्चेचा विषय ठरत आहे.