नागपूर : मिहानमधील प्रकल्प नागपूरबाहेर गेले, एका जडीबुटीवाल्या बाबाला प्रकल्पासाठी जमीन दिली, पण अद्याप प्रकल्प उभा राहिलेला नाही. उलट मिहानमध्ये प्रस्तावित काही प्रकल्प गुजरातला गेले, जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा विदर्भाचे नुकसानच झाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विदर्भ-मराठवाडाच्या विषयावर बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील २०१४-१९ मधील भाजप सरकारने एका जडीबुटीवाल्या बाबाला मिहानमधील जमीन दिली पण आजपर्यंत या जमिनीवर कोणताही प्रकल्प उभा राहिलेला नाही. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल असे स्वप्न दाखवले गेले. पण हा प्रकल्पच अद्याप सुरू झालेला नाही. मिहान हे विदर्भासाठी महत्त्वाचे आहे. पण येथील सगळे उद्योग बाहेर जात आहेत, इथले काही प्रकल्प गुजरातला पाठवले. जेव्हा भाजपचे सरकार असते तेव्हा विदर्भाचे नुकसानच झाले आहे.

हेही वाचा: तरुणीने आधी बाळाला दिला जन्म मग दाखल केली बलात्काराची तक्रार, विवाहित प्रियकर फरार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सूरजागड येथे ४०० वर्षे पुरेल एवढे मोठ्या प्रमाणात लोह खनिजाचे साठे आहेत. हा प्रकल्प झाल्यास महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लागू शकतो, भिलाईपेक्षाही मोठा प्रकल्प याठिकाणी होऊ शकतो. हा प्रकल्प झाला पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका आहे. सरकार लक्ष घालत नसेल अथवा आम्हाला उत्तर मिळणार नसेल तर काँग्रेस आमदार सूरजागडला भेट देऊन तिथली वस्तुस्थिती जनतेसमोर मांडतील, असेही ते म्हणाले.