पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाज संघटनेने केली आहे.एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी ‘नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यामुळे संपूर्ण ओबीसी व तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.

हेही वाचा >>> डॉक्टर पतीचे क्रौर्य, पत्नीची हत्या केली अन् मृतदेह मोटारीतून नेताना अडकला

तेली महासभेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वातील संघटनेने याबद्दल पटोले यांचा तीव्र निषेध नोदविला असल्याची माहिती युवा आघाडीचे नेते विपीन पिसे यांनी दिली. पटोले यांनी बेजबाबदार वक्तव्याबाबत माफी मागावी, अशा मागणीचे निवेदन आज संघटनेच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांना दिले.