गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त तोडगट्टा येथे खाणींविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिसांसोबत झालेल्या वादानंतर उधळण्यात आले. यावरून आता नक्षलवादी आक्रमक झाले आहेत. माओवादी संघटनेचा पश्चिम सबजोनल प्रवक्ता श्रीनिवास याने पत्रक जारी करून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची सुटका करण्याच्या मागणीसाठी ३० नोव्हेंबर रोजी जिल्हा बंदची हाकही दिली आहे.

हेही वाचा >>> मृतदेहासह रुग्णवाहिका थेट आणली पोलीस ठाण्यात! अपघातास कारणीभूत चालकाला अटक केल्यावरच नातेवाईक परतले

nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Panvel Municipal Commissioner, Inspects Drain Cleaning Work, Emphasizes Pre Monsoon Preparedness, before monsoon Drain Cleaning Work, drain cleaning in panvel, panvel municipal commissioner, kalamboli,
पावसाळ्यापूर्वी कामोठे, कळंबोलीत नालेसफाईला सुरूवात आयुक्तांचा अचानक काम पाहणी दौरा
Rashmi Barve
रश्मी बर्वे प्रकरणावर बुधवारी सुनावणी, जातवैधता प्रमाणपत्रामुळे निवडणूक अर्ज रद्द
Illegal occupation of Lalit High School ground in Dombivli by locals case filed against fourteen people
डोंबिवलीतील ललित हायस्कूलच्या मैदानाचा स्थानिकांकडून बेकायदा ताबा, चौदा जणांच्या विरुध्द गुन्हा दाखल

दोन वर्षांपूर्वी सुरजागड येथे लोहखाण उत्खनन सुरू झाले. आता एटापल्ली तालुक्यात आणखी सहा लोहखाणी प्रस्तावित आहेत. यास विरोध करत मागील अडीचशे दिवसांपासून दमकोंडवाही खाणविरोधी कृती समितीच्या झेंड्याखाली परिसरातील नागरिकांचे तोडगट्टा येथे आंदोलन सुरू होते. २० नोव्हेंबरला आंदोलनस्थळापासून जवळच वांगेतुरी येथे पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शंभर पोलिसांचे पथक परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आंदोलक व पोलिसांमध्ये वाद झाला. आंदोलकांनी धक्काबुक्की करत वांगेतुरीला जाण्यापासून रोखल्यानंतर पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत काही आंदोलक नेत्यांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलक पांगले तेथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे. दरम्यान, तोडगट्टा येथील आंदोलनकर्त्यांच्या अटकेवरून माओवादी संघटनेचा प्रवक्ता श्रीनिवास याने दोन पानी पत्रक जारी केले आहे. विकसित भारत यात्रेचा उद्देश मूळनिवासींचे अस्तित्व संपविणे व कॉर्पोरेट घराण्यांचा विकास करणे हा असल्याचा गंभीर आरोप त्याने केला आहे. झारखंडमध्ये कोळसा खाणींविरोधात आदिवासी लढत आहेत. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्थानिकांनी विरोध केला, तेव्हा पोलिसांनी त्यांच्याशी अरेरावी केली, असा आरोप या पत्रकात केला आहे. वांगेतुरी येथील पोलीस मदत केंद्र हटवा, आंदोलकांची सुटका करा, या मागणीसाठी ३० नोव्हेंबरला जिल्हा बंदची हाक दिली असून ग्रामसभांनाही गावागावात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे. श्रीनिवास याने या पत्रकात मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनाही आंदोलनकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी देखील केली आहे.

पोलिसांनी बळाचा वापर केला नाही – पोलीस

अधीक्षक तोडगट्टा येथे पोलिसांनी बळाचा वापर केला असता तर कोणी तरी जखमी झाले असते. पण एकाही आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठीहल्ला केलेला नाही. या आंदोलनाच्या मागण्या सरकारविरोधी व नक्षलवाद्यांचे समर्थन करणाऱ्या आहेत. नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठीच तेथे पोलीस मदत केंद्र उभारलेले आहे, असे गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.