scorecardresearch

भाजपचे ‘डिव्हाईड ॲन्ड रूल ” सूत्र  एका ठिकाणी यशस्वी; राष्ट्रवादीची प्रतिक्रिया

जेव्हा पुरोगामी विचारांची मतें विभागल्या जातात तेव्हाच धार्मिक विचारांचा विजय होतो.

ncp s reaction after bjp won
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

नागपूर :डिव्हाईड ॲन्ड रूल “हा – भाजपचा सुरूवातीपासूनचा प्रयत्न राहिला आहे. पोट निवडणुकीत एका ठिकाणी भाजप याच पद्धतीने यशस्वी झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शेखर सावरबांधे यांनी निवडणूक निकालावर दिली.

हेही वाचा >>> अमरावती : गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक; चुलीवर स्‍वयंपाक करून नोंदवला निषेध

:महाराष्ट्रात सरळ सरळ दोनच मतप्रवाह आहेत.एक पुरोगामी विचारांचा व दुसरा धार्मिक विचारांचा. जेव्हा पुरोगामी विचारांची मतें विभागल्या जातात तेव्हाच धार्मिक विचारांचा विजय होतो. कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे पुन्हा सिद्ध झाले. त्यामुळे निवडणूकीची लढाई ही केवळ उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यापासून होत नाही तर उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर, उमेदवारी मागे घेण्याची जी मुदत असते त्या ३दिवसाच्या दरम्यानच निवडणुकीचे भविष्य ठरते.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis : “निवडणूक आयोग विकला गेला आहे, ते तर सरकारचे…”, खा. अरविंद सावंत यांची टीका

या ३ दिवसाच्या लढाईत जर मविआ यशस्वी झाली तर त्यांनी ती निवडणुक जिंकणे सोपे होते. पण  या लढतीत चिंचवड सारखी भाजप यशस्वी झाली तर मविआ ला ती निवडणुक जिंकणे अवघड होते. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपच्या धनशक्ति पुढे पुरोगामी विचारांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठीचे आव्हानांचा कसा सामना करतात यावरच सर्वधर्मसमभाव विचारांची विजयी घोडदौड अवलंबून आहे. हे व्यवस्थापन करण्यात जर ही नेते मंडळी यशस्वी झाली तर भाजपा हद्दपार होणे निश्चित आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 15:31 IST
ताज्या बातम्या