नागपूर : देशभरातील आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैसे मागणारा नीरजसिंह राठोड हा भाजपचा कार्यकर्ता असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही तो सक्रिय असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. नागपूर पोलिसांनी नीरजला अटक केली  आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  अहमदाबाद येथील नीरजसिंह राठोड हा उच्चशिक्षित असून बेरोजगार आहे. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असून भाजपचा सदस्य म्हणून काम करीत होता, अशी माहिती त्यानेच पोलिसांना दिली. नीरजने भाजपची कामाची पद्धत आणि वरिष्ठांच्या आदेशाचे महत्त्व समजून घेतले. त्यासाठी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या सभांमध्ये भाग घेतला व नंतर थेट नड्डा यांच्या नावाचा वापर करून एका साथीदाराच्या मदतीने  भाजपच्या आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दाखवून पैसे मागितले. मध्य नागपूरचे आ. विकास कुंभारे, आ. टेकचंद सावरकर, आ. तान्हाजी मुटकुळे,  बदनापूरचे आ. नारायण कुचे,   राजेश पाडवी तसेच गोवा येथील  प्रवीण अगलेकर आणि नागालँडचे आ. बाशा चँग यांना मंत्रिमंडळात मंत्रीपदाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली. या सातपैकी दोघांनी तर नीरजच्या खात्यात पैसेही पाठवले.

cm eknath shinde gudhi padwa
“जो विकासाच्या आड येईल, त्याला आडवा करून…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; ठाण्याच्या शोभायात्रेत बोलताना केलं लक्ष्य!
Eknath Shinde, Eknath Shinde group
सरकारच्या कामांचा लेखाजोखा मांडत शिंदे गटाचा प्रचार
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
mumbai high court marathi news, cm eknath shinde marathi news
शहीदांच्या कुटुंबीयांप्रती मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवावा, शहीद मेजर सूद यांच्या पत्नीच्या मागणीबाबत उच्च न्यायालयाची टिपण्णी

बदनामीच्या भीतीने  गप्प

भाजपच्या २० पैकी काही आमदारांनी नीरजच्या खात्यात पैसे टाकले. परंतु, तो तोतया निघाला. ही बाब उजेडात येताच ज्या आमदारांनी नीरजच्या खात्यात पैसे टाकले त्यांनी गप्प राहणेच पसंत केले.