नागपूर : दैनंदिन जिवनात नागरिकांकडून टूथपेस्ट, बाम, केसांच्या तेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु या पदार्थांमध्ये मेंदूला उत्तेजित करणारे काही घटक असतात. त्यामुळे मेंदूला संभावित धोक्याबाबत मेंदूरोग तज्ज्ञांकडून गंभीर इशारा दिला गेला आहे. जागतिक मेंदू सप्ताहनिमित्त दिलेल्या गंभीर इशारामध्ये काय? हे आपण जाणून घेऊ या.

बऱ्याच कंपन्यांच्या टूथपेट, केसांचे तेल आणि बाम यासारख्या उपादनांमध्ये मेंदूला उत्तेजित करणारे घटक असतात. हे अपायकारक घटक तोंडाच्या संवेतनशिल त्वचेद्वारे शोषले जाऊ शकतात. त्यामुळे ते रक्त- मेंदूत अडथळ्याचा धोका असतो. या रासायनिक प्रक्रियेद्वारे मेंदूतील न्यूराॅन्स वारंवार एखाद्या उत्तेजनाच्या संपर्कात येतात. विशेषत: २४ ते ४८ तासांच्या अंतराने. ज्यामुळे मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये अतिउत्साह न्यूराॅन्स, सर्किट आणि नेटवर्क तयार होतात. त्यामुळे मायग्रेन, अपस्मार यांसारख्या विकारांचा विकास होऊ शकतो, असे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलाॅजीचे विश्वस्थ व पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले. प्राथमिक अभ्यासात काही घटकांच्या संपर्कामुळे मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, चक्कर किंवा व्हर्टिगो, शरीराच्या एका बाजूला वेदना, अपस्मार, चिंता, पॅनिक अटॅक, सायकोसिस आणि नैराश्य यासारख्या आजारांशी संबंध असल्याचे दिसून आले असल्याचेही डॉ. मेश्राम यांनी प्रसिद्धीपत्रकातून सांगितले.

आंतराष्ट्रीय शोध प्रबंधात काय ?

रुग्णांवर उपचारादरम्यान डॉक्टरांना टूथपेस्टचा वापर थांबवून अथवा टूथपेस्टची कंपनी बदलून रुग्णांना लक्षणांपासून आराम होत असल्याचेही मेंदूरोग तज्ज्ञांकडून निरीक्षण नोंदवले जाते. २०२१ मध्ये आंतराष्ट्रीय शोध प्रबंधानुसार एका प्रकरणात टूथपेस्टच्या वापराशी संबंधित क्लस्टर डोकेदुखीचा अहवाल दिला गेला. त्यात टूथपेस्टचा वापर थांबवल्यावर २ आठवड्याच्याआत रुग्ण पूर्णफणे बरा झाला. मायग्रेनच्या रुग्णांनी टूथपेस्ट आणि ओव्हर दे काउंटर बामचा वापर बंद केल्याने डोकेदुखीच्या लक्षणात खूप कमी आल्याचेही निरीक्षण नोंदवले गेले.

मेंदूत प्लास्टिक…

प्रौढ झेब्राफिश माॅडेल्स वापरून केलेल्या अन्वेषणात्मक अभ्यासात टूथपेस्टच्या संपर्कात रुग्णामध्ये अतिक्रियाशीलता, आक्रमकता आणि चिंता वाढल्याचे आढळले आहे. तर बऱ्याच टूथपेस्टमध्ये नॅनो आणि मायक्रोप्लास्टिक्स आढळले असून ते मेंदूत जमा झाल्यामुळेही त्रास होऊ शकतो, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

टूथपेस्टला पाणी किंवा मिठाच्या पाणीने बदलल्यास…

टूथपेस्टला पाणी किंवा मिठाचे पाणी सारख्या निष्क्रिय पर्यायांनी बदलल्यास मायग्रेन, क्लस्टर डोकेदुखी, चिंता यासारख्या न्यूरोसायकियाट्रिक स्थितींचा भार लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मौखिक आरोग्य आणि मेंदूशी संबंधित आजारांचा संबंध…

संशोधनात खराब मौखिक आरोग्य आणि अल्झायमर, स्मृतीभ्रंश, पक्षाघात, पार्किन्सन आणि इतरही मेंदूशी संबंधित आजाराच्या वाढत्या जोखमींमध्ये संबंध आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगात ३.५ अब्ज लोकांना तोंडाचा संसर्ग आहे. या आजारावर वेळीच प्रतिबंध व उपचार केल्यास मेंदूच्या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणावर कम होऊ शकतो, असेही डॉ. मेश्राम म्हणाले.