नागपूर : नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू चोरी केली जाते. पावसाळ्यात घाट बंद असल्याने वाळू उत्खननाला बंदी आहे, तरीही अवैध उत्खननाव्दारे चोरट्या मार्गाने वाळू शहरात दाखल होत आहे. तस्कर यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्यांचा वापर करतात. जिल्ह्यात औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखेची वाहतूक करण्यास मुभा आहे. त्याचा फायदा घेत तस्कर त्यांच्या ट्रकमध्ये खाली वाळू आणि वरती राख भरतात व कारवाईपासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात.

असाच एक प्रकार जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील सिल्लोर शिवारात पोलिसांनी उघडकीस आणला. पाटणसावंगी येथून धापेवाड्याकडे एका ट्रकमधून चोरटी वाळू नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पाटणसावंगी पोलिसांनी नाकेबंदी करून एमएच – ४०, वाय – २७७५ या क्रमांकाच्या टीप्परची तपासणी केली असता त्यात वरती राख व खाली वाळू दिसून आली. बेकायदेशीरपणे वाळू नेली जात असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Uran, chirner vilage, Uran taluka, Farmers did Sugarcane Cultivation, unfavorable land, unfavorable condition, 25 tonnes, konkani sugarcane, uran news, panvel news, marathi news,
उरण : चिरनेरमध्ये दीड एकरात २५ टन कोकणी उसाचे उत्पादन
Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
Stormy rains damage mango orchards in Trimbakeshwar taluka
त्र्यंबकेश्वर तालुक्यात वादळी पावसामुळे आंबा बागांचे नुकसान
Yavatmal lashed by stormy rain early morning Water in low lying areas
यवतमाळला भल्यापहाटे वादळी पावसाचा तडाखा; सखल भागात पाणी

हेही वाचा – चंद्रपूर : वीज कोसळून एक महिला ठार, अन्य एक महिला जखमी

हेही वाचा – उद्योग सुरू करण्यासाठी आता ‘हे’ मंडळ देणार १५ लाखांचे कर्ज, व्याज परतावा…

टिप्पर चालक व मालकावरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून आता ही रेती कुठल्या घाटावरून आणली व तो घाटाचा कंत्राट कोणाकडे आहे, याचा तपास सुरू आहे.