महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : सर्वोत्तम सेवेसाठीचे ‘एनएबीएच’ मानांकन प्राप्त नागपूर एम्समध्ये रुग्णांना लुबाडण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून नवीन क्लृप्ती वापरली जात असल्याचे उघड झाले आहे. एमआरआय काढण्यासाठी रुग्णांकडून ‘कॉन्ट्रास्ट’ हे इंजेक्शन मागवून नंतर ते न वापरता ते संबंधित दुकानात परत करून रक्कम हडप केली जात होती. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

n m joshi marg bdd chawl redevelopment
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास; दोन वर्षांत १२६० घरांचा ताबा देण्याचे म्हाडाचे आश्वासन
former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Black market, pune RTO, brokers,
पुणे आरटीओत ‘काळाबाजार’! दलालांनी उभारली पर्यायी यंत्रणा; कर्मचाऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

रुग्णांची वाढती संख्या बघत क्ष-किरणशास्त्र विभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी काळ्या कमाईचा नवीन मार्ग शोधला. यासाठी एका दलालाची मदत घेतली. रुग्ण ‘एमआरआय’साठी आल्यावर कर्मचारी त्याला बाहेरून ‘कॉन्ट्रास्ट’ हे इंजेक्शन आणायला सांगत होते. हे इंजेक्शन टोचल्यावर एमआरआयची प्रतिमा स्पष्ट येऊन निदान अचूक होत असल्याचे रुग्णाला सांगितले जायचे. रुग्णाने इंजेक्शन आणल्यावर ते नंतर ते दलालाच्या माध्यमातून औषध दुकानात परत करून पैसे घेतले जायचे. हा प्रकार एम्स प्रशासनाच्या निदर्शनात आल्यावर त्यांनी अजनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी एम्सचा एक कर्मचारी व एक दलाल अशा दोघांना अटक केली.

आणखी वाचा-सावधान! आज अतिमुसळधार पावसाचा इशारा

असा झाला उलगडा…

एम्समधील अमृत या औषध दुकानात एक व्यक्ती सलग दोन ते तीन वेळा कॉन्ट्रास्ट हे औषध व त्याचे देयक घेऊन ते परत करण्यासाठी वेगवेगळ्या दिवशी आला. येथील कर्मचाऱ्यांना संशय झाल्याने त्यांनी त्याचा मागोवा घेतला. सुरक्षा रक्षकांच्या मदतीने संबंधिताला पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ तीनहून अधिक इंजेक्शन सापडले. त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता तो एम्समधील एका कर्मचाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असल्याचे दिसून आले. यातून या दोघांचा या गैरप्रकारात सहभाग उघड झाला.

कर्मचाऱ्याची हकालपट्टी

या प्रकरणात रजत राकेश गिलडीया (२६) हा कंत्राटी कर्मचारी आणि सोबीत उपरेती या दोघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सोनेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम परदेशी यांनी दिली. याप्रकरणी अधिक माहितीसाठी एम्सचे विजयकुमार नायक यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.