नागपूर : नवजात बाळाची विक्री करणारे उपराजधानीतील रॅकेट गुन्हे शाखा पोलिसांनी उघडकीस आणले. या रॅकेटमध्ये नामांकित डॉक्टरचा समावेश असून त्यांच्यासह दोन दलालांना पोलिसांनी अटक केली. या रॅकेटने तेलंगणा राज्यातील प्राध्यापक दाम्पत्याला 7 लाख रुपयांमध्ये नवजात बाळाची विक्री केली होती. डॉ. विलास भोयर, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजीबा निमजे आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (शांतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरीमध्ये ‘क्युअर इट’ नावाने मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयाचा संचालक डॉ. विलास भोयर असून त्याने रुग्णालयातून नवजात बाळ विक्रीचा गोरखदंधा सुरू केला होता. त्याने आतापर्यंत अनेक नवजात बाळांची धनाढय़ दाम्पत्यांना विक्री केल्याची माहिती आहे. त्याच्या या गोरखधंद्यात काही परिचारिका, महिला डॉक्टर, पॅथोलॉजीस्ट, स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी, महिला व पुरुष दलालांची मोठी साखळी आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Newborn baby trafficking racket busted in nagpur zws
First published on: 18-03-2022 at 01:04 IST