धंतोलीतील १९ रस्त्यांवर कायमस्वरूपी ‘नो पार्किंग’

पहिली अधिसूचना १ जूनला प्रसिद्ध करण्यात आली.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तीन रस्त्यांवर एकेरी वाहतूक

धंतोली परिसरातील वाहनतळाची समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वाहतूक पोलीस आणि महापालिकेने काही उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे आता अनेक १९ रस्ते ‘नो पार्किंग झोन’ करण्यात आले असून ३ रस्त्यांवर एकेरी वाहतूक करण्याचा प्रयोग वाहतूक पोलिसांनी राबविला होता. आता धंतोली परिसरातील वाहतूक व्यवस्था अशीच कायम राहणार असून ती अधिसूचना सहपोलीस आयुक्तांनी नियमित केली आहे.

धंतोली परिसरात मोठय़ा प्रमाणात रुग्णालये आहेत. याशिवाय मंगल कार्यालये आणि अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नाही. त्यामुळे धंतोली नागरिक मंडळाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून परिसरातील वाहतूक कोंडीचा विषय उचलला होता. त्यावर न्यायालयाने महापालिका आणि वाहतूक पोलिसांना धंतोली परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी धोरण निश्चित करून १९ रस्ते ‘नो पार्किंग’ जाहीर केले आहे, तर तीन रस्ते एकेरी वाहतुकीसाठी जाहीर केले होते. पहिली अधिसूचना १ जूनला प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर वारंवार अधिसूचनेला मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, सहपोलीस आयुक्तांनी आता त्या रस्त्यांवरील ‘नो पार्किंग’ अधिसूचना नियमित केली व विद्यमान वाहतूक व्यवस्था कायम राहील. शासकीय वाहने, पोलीस विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि अधिकृत ऑटो थांबे यांना या अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे.

एकेरी वाहतुकीचे रस्ते

१)     सराफा कोर्ट ते सिहो रुग्णालय

२)     वरंभे रुग्णालय ते सिल्व्हर पॅलेस

३)     राजकमल कॉम्प्लेक्स ते अमरज्योती कॉम्प्लेक्सया रस्त्यांवर आता ‘नो पार्किंग’

१)     राजकमल अपार्टमेंट ते गोरक्षण सुरक्षा भिंत

२)     सुनील पान मंदिर ते आरती प्रोव्हिजन्स सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत

३)     भारूका भवन ते डॉ. पेंडसे कॉर्नर

४)     न्यूरॉन रुग्णालय ते अ‍ॅड. लाला भवन

५)     भिवापूरकर चेंबर ते धंतोली गार्डन टी-पॉईंट

६)     मिश्रा हाऊस ते साक्षी अपार्टमेंट

७)     श्रीकृष्ण रुग्णालय ते काँग्रेसनगर-रहाटे कॉलनी

८)     डॉ. अमोल महाजन रुग्णालय ते रॉलका हॉटेलपर्यंत

९)     डॉ. ढोबळे ते विजयानंद सोसायटी मार्ग

१०)    न्यूरॉन रुग्णालय ते जनता चौक

११)    एलआयसी बिल्डींग ते गोखले हाऊस,     जोग हाऊस (पी-१, पी-२ पार्किंग)

१२)    गोखले हाऊस ते अमरज्योती अपार्टमेंट

१३)    एच.पी. गॅस गोदाम ते काँग्रेसनगर

१४)    पत्रकार भवन ते मेहाडिया चौक (पे अ‍ॅण्ड पार्क वगळून)

१५)    मेहाडिया चौक ते राजकमल अपार्टमेंट (दुचाकीसाठी एका बाजूने पार्किंग उपलब्ध)

१६)    धंतोली गार्डनच्या चहुबाजूने कारसाठी सिंगल लेन पार्किंग

१७)    मेहाडिया चौक ते होमगार्ड टी-पॉईंट (पी-१ए आणि पी-२ए पार्किंग)

१८)    अरुणा पॅलेस ते विठ्ठल अपार्टमेंट

१९)    मेहाडिया चौक ते होमगार्ड कार्यालयदरम्यान उद्यानाच्या पूर्व बाजूस दुचाकीसाठी सिंगल लेन पार्किंग

२०)    जनता चौक ते रहाटे कॉलनी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: No parking in nashik dhantoli area

ताज्या बातम्या