नागपूर : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य असलेला आणि राजस्थान पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ रघु ऊर्फ भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले.यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेदरम्यान त्याला अटक करण्यात आली होती. तो विदर्भात काय करीत होता. तो नेमका कुठला आहे आणि त्या यवतमाळशी कनेक्शन आहे, असे प्रश्न आता विचारले जात आहेत.
तो बिश्नोई- गुज्जर गैंगचा कुख्यात सुपारी किलर आहे. तो फरार होता. भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. तो अहारना खुर्द, पो.मेहटीयाना, होशियारपूर (पंजाब) येथील आहे. भुपेंद्र सिंग उर्फ भिंडा उर्फ रघुवीर (35 वर्षे) या नावाने ओळखला जातो.लॉरेन्स बिश्नोई आणि बित्री गुज्जर टोळीशी संबंधित असलेला हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून विविध राज्यांतील खून, खंडणी व आर्म ॲक्टसारख्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला यायवतमाळ येथील दांडेकर ले-आऊट येथून अटक केली. शहरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ भिंडा यवतमाळच्या जांब रोड परिसरात ओळख लपवून राहत आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी दांडेकर ले-आऊट भागात तो भाड्याने राहत असलेल्या घराला घेराव घालून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच भिंडा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर त्याला राजस्थान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अमेरिकेतून पैसे
अमेरिकेतील सौरव गुज्जर (बिल्लू गुज्जरचा भाऊ व गोल्डी ब्रार याचा निकटवर्तीय) हा गेल्या तीन वर्षांपासून भिंडाला डॉलरमध्ये पैसे पाठवायचा. त्या पैशांतून हा खर्च भागवायचा, शस्त्र व पुढील गुन्ह्यांसाठी तयारी करायचा असे तपासात निष्पन्न झाले आहे.
२० गुन्हे दाखल
भिंडाविरुद्ध पंजाब व राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे २०२३ मध्ये बाडमेर (राजस्थान) येथे झालेल्या सुपारी घेऊन झालेल्या खून प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. भिंडा याने हरपालसिंग उर्फ रिंकूचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता.