२४ तासांत १३ रुग्ण आढळल्याने चिंता वाढली

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत एकही करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला नाही, परंतु तब्बल १३ नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. तर नवीन रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय करोनाग्रस्तांची संख्या ५३ वर पोहचली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील ४२, ग्रामीणचे ११ अशा एकूण ५३ रुग्णांचा समावेश आहे. तर दिवसभरात शहरात ८, ग्रामीणला ५ असे एकूण १३ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख ४० हजार ४९५, ग्रामीण १ लाख ४६ हजार २३०, जिल्ह्याबाहेरील ६ हजार ९२५ अशी एकूण ४ लाख ९३ हजार ६३५ रुग्णांवर पोहचली आहे. तर जिल्ह्यात एकही मृत्यू नसल्याने शहरातील आजपर्यंतची मृत्यूसंख्या ५ हजार ८९३, ग्रामीण २ हजार ६०४, जिल्ह्याबाहेरील १ हजार ६२५ अशी एकूण १० हजार १२२ रुग्ण इतकी आहे. तर दिवसभरात शहरात ४, जिल्ह्याबाहेरील २ असे एकूण ६ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३४ हजार ५६३, ग्रामीण १ लाख ४३ हजार ६१५, जिल्ह्याबाहेरील ५ हजार २८१ अशी एकूण ४ लाख ८३ हजार ४५९ व्यक्तींवर पोहचली.

ग्रामीणमध्ये चाचण्यांच्या तुलनेत बाधित अधिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 शहरात दिवसभरात २ हजार ४४७, ग्रामीणला ७९१ अशा एकूण जिल्ह्यात ३ हजार २३८ संशयितांच्या चाचण्या झाल्या. २७ नोव्हेंबरनंतर (३,१०० चाचण्या) जिल्ह्यात तीन हजारावर चाचण्या नोंदवल्या. त्यातच ग्रामीणला केवळ ७९१ चाचण्यात पाच नवीन रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.