नागपूर : मेडिकल रुग्णालयातील ‘दि मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’ची निवडणूक रद्द झाल्याचा आदेश शुक्रवारी सकाळी काढण्यात आला होता. परंतु काही तासांतच ही निवडणूक सोमवारी घेण्याचे आदेश निघाले. त्यामुळे आता ही निवडणूक ३ जुलैला होणार आहे.

हेही वाचा – संघ परिवारातील संघटनांची महत्त्वाची बैठक नागपुरात सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाने पावसाळ्यात शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असतात. मतदानाला वेळेत पोहोचू शकत नाही. मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेत सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्या. मात्र, आता यातून नागपुरातील ‘दि मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी लि.’च्या निवडणुकीला वगळले. त्यामुळे ही निवडणूक आता ३ जुलै रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेडिकल परिसरातील बंगला क्र. ८ मध्ये होईल. या निवडणुकीत चार पॅनेल असून सुमारे दोन हजारांवर मतदार निवडणुकीत मतदान करणार आहेत.