२४ तासांत ५४ मृत्यू; १,२७३ नवीन बाधितांची भर

नागपूर : जिल्हयात २४ तासांत ५४ मृत्यूंची नोंद झाली असून सलग चौथ्या दिवशीही चाचण्यांची संख्या कमी असल्याने १ हजार २७३ नवीन करोना बाधितांची भर पडली. एकीकडे बाधित वाढत असतांनाच दुसरीकडे  करोनामुक्त झालेल्यांचे प्रमाण ८३.१८ टक्यांवर पोहचल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला आहे.

करोनामुळे दगावेल्या ५४ रुग्णांपैकी ४१ जण शहर, ५ जण ग्रामीण, ८ जण जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. त्यामुळे आजपर्यंत शहरात दगावलेल्यांची एकूण संख्या १ हजार ५९९, ग्रामीण ३५४, जिल्ह्य़ाबाहेरील १९७ अशी एकूण २ हजार १५० वर पोहचली आहे. १ हजार २७३  पैकी ९२५ रुग्ण शहर, ३४० ग्रामीण, ८ जिल्ह्य़ाबाहेरील आहेत. त्यामुळे आजपर्यंतच्या येथील बाधितांची संख्या ६६ हजार ३८० वर पोहचली आहे. मंगळवारीही शहरात ३ हजार ४४५, ग्रामीणला १ हजार ८८२ चाचण्या  झाल्यान बाधितांची संख्या कमी  दिसत आहे. मंगळवारी शहरातील १ हजार ३६२ तर ग्रामीणचे ३०० असे एकूण १ हजार ६६२ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ४५ हजार ३७७, ग्रामीण ९ हजार ८३५ अशी एकूण ५५ हजार २१२ वर पोहचली आहे.

विदर्भातल

(२२ सप्टेंबर) मृत्यू

जिल्हा                   मृत्यू

नागपूर                       ५४

वर्धा                           ०२

चंद्रपूर                         ०४

गडचिरोली                   ०१

यवतमाळ                    ०३

अमरावती                    ०८

अकोला                      ०२

बुलढाणा                      ०१

वाशीम                        ०२

गोंदिया                      ०४

भंडारा                       ०२

एकूण                       ८३