रेल्वेगाडीतील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त आणि जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी यशवंतपूर- दिल्ली सरायसोहिला दुरान्तो एक्सप्रेस तब्बल सव्वा तास रोखून धरली. या गाडीतील अशाप्रकारची पंधरा दिवसातील दुसरी घटना आहे.
रेल्वेतील जेवणाचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न करण्यात असल्याचे दावा केला जात असलातरी निकृष्ट मिळत असल्याने गाडी रोखून धरण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. शिवाय रेल्वेगाडी प्रवासाला निघण्यापूर्वी तिची देखभाल-दुरुस्ती केली जाते. साफसफाई केली जाते तरी प्रवासात वातानुकूति यंत्रणेत होणारे बिघाड होत आहेत. या गाडीत रेल्वेत याआधी देखील असा प्रकार घडला आहे.
या गाडीचे भाडे इतर गाडीपेक्षा अधिक आहे. मात्र गाडीतील सुविधा आणि सेवा मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने प्रवाशांनी संपात व्यक्त केला. सिकंदराबादेपासून या गाडीतील बी१, बी२, बी३ या डब्यातील वातानुकूलित यंत्रणा नादुरुस्त झाली. प्रवाशांनी यासंदर्भात तिकीट तपासणीसाकडे तक्रार केली. त्यांनी ते गांर्भीयाने घेतले नाही. आयआरटीसीटीच्या तक्रार क्रमांकावर तक्रार केली. रेल्वे मंत्र्याला ट्विट देखील केले. परंतु एसी दुरुस्त झाले नाही. प्रवाशांना पिण्यासाठी गरम पाणी देण्यात आले. तसेच जेवणाचा दर्जाही निकृष्ट होता, असे या गाडीतील प्रवाशी आर.एस. मनी यांनी सांगितले.
नागपूर स्थानकावरून गाडीत जेवण चढविण्यात आले. मात्र ते निकृष्ट असून लहान मुलांना खाण्यायोग्य नसल्याचे कारण प्रवाशांनी विरोध केला. नागपूर रेल्वे स्थानकावरून गाडी निघाली आणि साखळी खेचली. पुन्हा सुरू झाली आणि साखळी खेचली. असे सहावेळा घडले. प्रवाशांचा संताप पाहून रेल्वे अधिकारी थूल यांनी पुढील स्थानकावर व्यवस्था केली जाईल, असे सांगितले. परंतु प्रवाशांनी तसे लेखी द्यावे, अशी मागणी केली आणि जेवणाची व्यवस्था होईस्तोवर गाडी पुढे जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. हा गोंधळ सुमारे सव्वातास नागपूर स्थानकावर सुरू होता. अखेर रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने प्रवाशांना गाडीत बसवण्यात आले.