बुलढाणा : हिंगोली वरून पुणे येथे निघालेल्या व भर वेगातील (एमएच ३७ एफ ८००६ क्रमांकाच्या) खासगी ट्रॅव्हल्स बसचे टायर अचानक फुटून अनियंत्रित वाहन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळले. लोणार तालुक्यातील वेणी फाट्या जवळ २६ जूनच्या रात्री साडेदहाच्या सुमारास झालेल्या या अपघातात १२ प्रवाशी जखमी झाले.

बहुतांश जखमी हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांच्यावर लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लक्झरी बसचेही मोठे नुकसान झाले आहे. लोणार शहरापासुन ३ किमी अंतरावर शारा गावाजवळील वेणी फाट्याजवळ एम.एच.३७ एफ.८००६ क्रमांकाच्या खूराणा ट्रायव्हल्सचे समोरचे टायर फुटले. रस्त्याच्या बाजूला पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात ट्रायव्हल्स कोसळली.

हेही वाचा >>>नंदुरबारचा विधी संघर्ष बालक बुलढाण्यातून फरार; निरीक्षण गृहाच्या बाथरूममधून केला पोबारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींमध्ये राहुल मिलींद इंगोले (वय २१ रा.वाशीम), बालाजी मोरे (वय ३२ रा.कळमनूरी), वर्षा बालाजी मोरे (वय २८ रा.कळमनूरी), सरस्वती बाबुराव खाडे (वय ६० रा.पिंपरी ता.हिंगोली), बालाजी बाबुराव खाडे (वय ३१ रा.पिपरी) ,विजयमाला बालाजी खाडे (वय २४ रा.पिंपरी), सूरेखा संतोष जाधव (वय २५ रा. हिंगोली), निर्मला वैजीनाथ वाघमारे (वय २४ रा.कळमनुरी), प्रवीन बाबुराव बाजीवाले, आशा संतोष मोरे (वय ८ सेलशगाव), शेख यूनूस शेख आयूष (वय ३० रा. हिंगोली), आशोक गोमाजी कुंडले (वय ५० रा. साळवी) यांचा समावेश आहे. अपघाताची माहीती मिळताच पीएसआय शरद आहीरे, पिएसआय सूरज काळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर धाव घेत मदत कार्य सुरू केले.