यवतमाळ : जिल्ह्यातील झरी तालुक्यात येत असलेल्या मुकूटबन येथील मातोश्री पुनकाबाई कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरून इयत्ता बारावीची इंग्रजीची प्रश्नपत्रिका १५ मिनिटांतच व्हायरल झाली होती. पोलिसांना या पेपरफुटीचा मुख्य सुत्रधार रोहित भटवलकर (२४), रा. नेरडपुरड ता. वणी याचा अखेर शोध लागला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने, ‘खिडकीजवळ बसलेली एक विद्यार्थिनी प्रश्नपत्रिका चाळत असताना आपण खिडकीतून प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र घेऊन ते व्हायरल केले, हा केलेला दावाही हास्यास्पद आणि संशयाला वाव देणारा ठरला आहे.

बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानासाठी शासन आणि शिक्षण विभागाकडून कठोर पावले उचलली गेली. मात्र मुकूटबन येथील केंद्रावर पहिल्याच दिवशी शासनाच्या अभियानाला हरताळ फासला गेला. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. या गैरप्रकारानंतर येथील परीक्षा केंद्रप्रमुख अनिल दुर्लावार आणि पर्यवेक्षक प्रेमेंदर येलमवार यांची बयाणे नोंदवून त्यांना सूचनापत्रावर सोडून देण्यात आले.

हेही वाचा >>> मास्टर ब्लास्टरला ताडोबात तीन दिवसात १२ वाघांचे दर्शन; सचिन म्हणतो, “मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…”

याप्रकरणी रोहित भटवलकर याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढल्याची कबुली दिली. पेपर सुरू होताच केंद्रावरील खोली क्र. ८ मधील खिडकीतून एका विद्यार्थिनीच्या नकळत तिच्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेतल्याचे रोहितने पोलिसांना सांगितले. संबंधित विद्यार्थिनीचा जबाबसुद्धा पोलिसांनी नोंदविला आहे. प्रश्नपत्रिका वाचत असताना कोणीतरी खिडकीतून मोबाईलद्वारे काही क्षणातच प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र घेतल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. रोहितचे काही मित्र या केंद्रावरून परीक्षा देत आहेत. ‘आपण भिंतीवरून उडी मारून परीक्षा केंद्रात शिरलो.

हेही वाचा >>> ‘कोणी घर देता का घर..’ राज्यात पाच लाख घरकूल बांधणीचे काम शिल्लक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोली क्र. ८ जवळ पोहोचताच खिडकीजवळील विद्यार्थिनीच्या प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र घेतले व व्हायरल केले’, असे रोहितने जबाबात म्हटले आहे. ही बाब तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तेथून पिटाळून लावले. मात्र तोपर्यंत प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती. या केंद्रावरील अनागोंदीमुळे येथे परीक्षा देणारे विद्यार्थी तणावात आहेत. बुधवारी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या पथकाने  या केंद्रास भेट दिली. मंडळाचे अधीक्षक भगवान किनाके व झरीचे गटशिक्षणाधिकारी मोहम्मद याकुब शेख हजम आदींनी केंद्राची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन केले.  या संपूर्ण प्रकारात स्थानिक  परीक्षा केंद्रावरील कोणी कर्मचारी सहभागी असावा, अशी चर्चा आहे.