गोंदिया : बळीराजाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सण पोळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकरी आपल्या लाडक्या ‘सर्जा राजा’चा साजश्रुंगार करण्यासाठी धडपडत आहे. मात्र, महागाईमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. यंदा साजश्रुंगार साहित्याच्या किंमतीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे दिसते आहे.

शेतात शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काळ्या मातीत वर्षभर राबणाऱ्या सर्जा राजाच्या ऋणाची उतरण करण्यासाठी पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा ठरत आला आहे. यानिमित्ताने बाजारपेठही सजली आहे. बैलांना पोळ्यानिमित्त सजावट करण्यासाठी आकर्षक वस्तू विक्रीसाठी बाजारात आल्या आहेत. मात्र, या सर्व साहित्यांच्या कच्च्या मालाची दरवाढ व त्यावर लागलेल्या जीएसटीमुळे बैलांचे श्रृंगार साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर महागाईची ‘झूल’ दिसून येत आहे. नुकताच पाऊस बरसल्याने यापूर्वी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळे सर्जाराजासाठी ‘होऊन जाऊ दे खर्च’, म्हणत शेतकरी सज्ज झाला आहे.

Before going bike riding during monsoons
पावसाळ्यात बाईक घेऊन घराबाहेर पडण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की फॉलो करा
nakshatrawadi mhada houses marathi news
छत्रपती संभाजी नगरमधील नक्षत्रवाडीत लवकरच म्हाडाची १०५६ घरे, अतुल सावे यांची घोषणा
Health Special, mental health,
Health Special : युवापिढीने मनःस्वास्थ्य टिकवण्यासाठी काय करावं?
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
can washing your hair regularly for 21 days keep dandruff away what dermatologist experts said read
केस २१ दिवस नियमितपणे धुतल्याने कोंड्याची समस्या दूर होते का? डॉक्टर काय सांगतात, वाचा
Highly educated youth arrested for murdering his wife due to suspicion of character and filing a false complaint pune print news
चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून करून खोटी तक्रार देणारा उच्चशिक्षित तरुण गजाआड; शिरूरमधील रांजणगाव सांडसमधील घटना
Essential motorcycle gear to carry during monsoon rides
पावसाळ्यात फिरायला जाताय? मग अशी करा तयारी; ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
Five must-follow steps to rescue flooded car
पावसाळ्यात कार पूराच्या पाण्यात अडकल्यानंतर तर काय करावे? नेहमी लक्षात ठेवा या ५ गोष्टी

हेही वाचा – गायीच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास म्हणून करतात अन्नदान; परंतु डॉक्टर म्हणतात, “यामुळे गायीचे पोट फुगून…”

हेही वाचा – बुलढाण्यातील सकल मराठा समाजाच्या महामोर्च्यात मनोज जरांगेंचे कुटुंबीय सहभागी होणार? आयोजकांचे जोरदार प्रयत्न

लाकडी नंदीचेही दर गगनाला

बैलपोळ्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले आपापल्या लाकडी बैलाला सजवतात. तान्हा पोळ्यासाठी बाजारपेठेत लाकडी नंदी विक्रीस आलेले आहेत. मात्र, महागाईचा फटका लाकडी नंदीलाही बसला असून दर गगनाला भिडले आहेत. सध्या बाजारात एक हजारापासून तर १० हजार रुपयांपर्यंतचे लाकडी नंदीबैल विक्रीसाठी उपलब्ध आहेत.