scorecardresearch

Premium

“देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, “इतकी मस्ती…”

”देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट की दोन्हीची इतकी मस्ती?”, असा सवाल करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीका केली.

Prakash Ambedkar criticized Devendra Fadnavis
"देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत की सत्तेने भ्रष्ट?", ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल; म्हणाले, "इतकी मस्ती…" (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अकोला : ”देवेंद्र फडणवीस सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट की दोन्हीची इतकी मस्ती?”, असा सवाल करीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीसांवर खरमरीत टीका केली. याच मुजोर वृत्तीचा अकोला शिकार असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा – बुलढाणा-मलकापूर राज्य मार्गावर भीषण अपघात, अतिरक्तस्त्रावामुळे आरोग्य कर्मचारी घटनास्थळीच ठार

Sudhir Mungantiwar at japan
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल,” सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास; म्हणाले…
Devendra Fadnavis, Sanjay Raut, Sanjay Rauts statement, Devendra Fadnavis criticized Sanjay Raut
“संजय राऊत यांच्या पक्षात कोण मदारी आणि कोण बंदर, हे त्यांनाच ठाऊक” देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
chandrashekhar bawankule and gopichand padalkar
पडळकरांचे वादग्रस्त विधान, माफी मागितली चंद्रशेखर बावनकुळेंनी!
chandrababu naidu arrest
‘चंद्राबाबू नायडू यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई’; राजमहेंद्रवरम कारागृहात रवानगी

हेही वाचा – माहेरी गेलेली पत्नी परत येत नसल्याने पती संतापला; सासूसह मेहुण्याची हत्या करून स्वत:ही केली आत्महत्या

नागपूर शहराला नुकताच पुराचा मोठा फटका बसला. त्यानंतर पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्वसामान्य नागरिकाला दिलेल्या वागणुकीवरून ॲड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचा समाचार घेतला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट करून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “नागपुरात पुरात अडकलेल्या निष्पाप लोकांचा बळी गेला आहे आणि त्याची दाद मागण्यासाठी गेलेल्या लोकांना इतकी तुच्छ वागणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात, यातून शिवसेना- भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारचा मुजोरपणा बरेच काही सांगून जातो. खरं पाहता यात आश्चर्य काहीच नाही. हाच प्रकार मी अगणित वेळा बघितला आहे. कित्येक वर्षांपासून अकोला देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मुजोर वृत्तीचा शिकार आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Prakash ambedkar criticized devendra fadnavis comment on the flood situation in nagpur ppd 88 ssb

First published on: 25-09-2023 at 15:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×