वर्धा : सध्या बियाणे व खते खरेदी करण्यास शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र यात त्यांची फसवणूक होवू नये म्हणून कृषी विभाग दक्ष झाला आहे. विभागाने नेमलेल्या भरारी पथकाने कृषी सेवा केंद्राची तपासणी करतांना बियाणे प्रतवारी , स्टॉक, एम आर पी दराने विक्री अश्या बाबी पडताळल्या.त्यात समुद्रपूर् व हिंगणघाट येथील पंचवीस दुकानांची आकस्मिक तपासणी केली.दोन्ही तालुक्यातील आठ कृषी केंद्रावर बोगस कारभार दिसून आल्याने त्यांना कृषी निविष्ठा विकण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कृषी अधीक्षक प्रभाकर शिवणकर यांच्या चमूने ही कारवाई केली आहे.खतांचा साठा असलेल्या गोदामांचीही तपासणी झाली.बनावट ग्राहक पाठवून ही तपासणी करण्यात आली.शेतकऱ्यांना खरेदी करतांना काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.बियाणे खरेदी केल्यावर पक्के बिल घ्यावे, खत खरेदी साठी आधार कार्ड सोबत न्यावे,बियाणे, खत,किट नाशक एम आर पी दरानेच विकत घ्यावे,दुकानदार तुटवडा सांगत अधिक दराने विक्री करत असल्यास तक्रार करावी,त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.असे कृषी विभागाने स्पष्ट केले.

More Stories onवर्धाWardha
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prohibition of sale of seeds in taluka mismanagement of agriculture center pmd 64 ysh
First published on: 07-06-2023 at 09:54 IST