चंद्रपूरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव | Proposal to bring saras bird to collector ajay guhane nagpur bench bhandara gondiya Chandrapur | Loksatta

चंद्रपुरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव

गोंदियाच्या सेवा संस्थेने अभ्यास करून सारस पक्षी विदर्भातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची नोंद केली होती.

चंद्रपुरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव
चंद्रपूरात सारस पक्षी आणण्याचा प्रस्ताव

चंद्रपूर : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी २०२२ ला ९ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठक व चर्चा होऊन आता सारस संवर्धन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यात जिल्ह्यातून नामशेष झालेला सारस पक्षी पुन्हा चंद्रपुरात आणण्यात यावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. वन्यजीव सप्ताहनिमित्ताने येथे प्रयत्न सुरू झाले आहे. गोंदियाच्या सेवा संस्थेने अभ्यास करून सारस पक्षी विदर्भातून नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याची नोंद केली होती. त्याची दखल घेवून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५ जोनवारी २०२२ ला दिलेल्या आदेशानुसार भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर येथे लुप्त होणाऱ्या सारस क्रेन पक्षाच्या संवर्धनासाठी सारस संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली.

या समितीद्वारे जिल्ह्यातील पक्षांचे अस्तित्व, स्थिती, ऱ्हासाची कारणे आणि संरक्षणासाठी आराखडा तयार करण्यात आला. विविध विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यात एकही सारस पक्षी गेल्या २ वर्षापासून आढळला नसल्याचे लक्षात आल्यामुळे संस्थेचे सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी सारस पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात आणण्यात यावा, असा प्रस्ताव समितीसमोर मांडला. त्यानुसार हा प्रस्ताव समितीने न्यायालयाकडे पाठविला आहे.इथे लहान पिले आणायची, जोडी आणायची की कृत्रिमपणे अंडी उबवायची याचा अभ्यास, आणि वन्यजीव बोर्डाच्या मान्यतेनंतरच हा पक्षी पुन्हा आणण्यात येणार आहे.

हेही वाचा : चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

चंद्रपूर जिल्ह्यात एकाही सारस पक्षी आढळला नाही. परंतु, भविष्यात हा पक्षी आला तर त्याला लागणारा अधिवास सुरक्षित राहावा ह्यासाठी समितीने उपाय योजना सुचविल्या आहेत.चंद्रपूर येथे २० वर्षापूर्वी जुनोना येथे ४ सारस पक्षी होते. १० वर्षापूर्वी केवळ १ पक्षी उरला होता. आता हा एकमेव सारस अनेक वर्षे राहून तो सुद्धा मागील वर्षीपासून दिसेनासा झाला आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना विचारणा केली असता सारस ‘कॉन्झरवेशन प्लॅन’ तयार केला असल्याची माहिती दिली. सारस पक्षी येथे आणता येत असला तरी त्याला चित्त्याप्रमाणे ठेवता येणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
चंद्रपूर : ७० वर्षांची जुनी तीन मजली इमारत कोसळली, मलब्याखाली दबलेल्या महिलेला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

संबंधित बातम्या

इन्‍स्‍टाग्रामवर मैत्री, प्रेम आणि धोका; तरुणीचे वि‍वस्‍त्र छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने…
उपमुख्यमंत्र्यांनी सारथ्य केलेल्या गाडीचा मालक विक्की कुकरेजा कोण आहे?
नागपूर : तब्बल १२ हजार ६०० खुल्या भूखंडांवर कचरा ; पावसाळ्यात शहराचे आरोग्य धोक्यात
नागपूर : मित्राला वाचवण्यासाठी घेतली पाण्यात उडी, दोघेही बुडाले ; अंबाझरी तलाव ठरतोय मृत्यूचा सापळा
दोन वर्षांच्या खंडानंतर उद्या नागपुरात निघणार प्रसिद्ध काळी व पिवळी मारबत

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द