जळगाव – देशासह राज्यात बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे. तरुणांच्या हातांना काम नाही. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळत, राष्ट्रीय बेरोजगारी दिवस म्हणून साजरा करीत शहर-जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसतर्फे रविवारी अनोखे आंदोलन करण्यात आले.

शहरातील इच्छादेवी चौकात युवक काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन करीत निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मुजीब पटेल, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनू सोनार, आशिष पाटील, नयन कोळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

Chandrakant Patil, shivsena candidate,
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट
Amravati, Vanchit Bahujan Aghadi,
अमरावतीत ‘वंचित’मध्‍ये फूट; जिल्‍हाध्‍यक्षांचा काँग्रेसला पाठिंबा
PM Narendra Modi On Congress
पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला; म्हणाले, “बारशाला गेला आणि बाराव्याला…”
chandrapur, Tension Erupts Teli Samaj prograame, Teli Samaj Felicitation progrrame, Congress Leaders Declare Support, Controversy Ensues, pratibha dhanorkar, chandrapur news, lok sabha 2024,
चंद्रपूर : निमंत्रण सत्कार सोहळ्याचे, पाठिंबा काँग्रेसला….वास्तव कळताच धक्काबुक्की….

हेही वाचा – नाशिक: सारंगखेडा पुलाला भगदाड, नंदुरबार-धुळे वाहतूक मार्गात बदल

हेही वाचा – बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न – कौशल्य विकास कार्यक्रमात छगन भुजबळ

आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष मराठे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे खोटे आश्‍वासन दिले होते. आज मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत; परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला मोदी सरकार रोजगार देऊ शकले नाही, असे सांगत त्यांनी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांच्या आदेशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात रविवारी युवक काँग्रेसतर्फे पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आल्याचे सांगितले.