काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी भाजप कथितरित्या षडयंत्र आखत असून याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली. आज शुक्रवारी मोताळा व लोणार येथे काँग्रेस नेते व पदाधिकारी यांनी निषेध नोंदविला.
हेही वाचा >>>बुलढाणा: शेगाव ‘पं.स.’चे माजी उपसभापती पुंडलिक पारस्कर यांची आत्महत्या
मोताळा येथे जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक व तालुका अध्यक्ष गजानन मामलकर यांच्या नेतृत्वाखालील मानवी साखळी करून राहुल गांधी यांच्या विरुद्धच्या कारस्थानाचा निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात ऍड गणेशसिंह राजपूत, साहेबराव डोंगरे, अभिजित खाकरे, आबीद कुरेशी, अतिष इंगळे, सोनू कुळे, श्रीमती नरवाडे आदी सहभागी झाले. या आंदोलकांना बोराखेडी पोलिसांनी ताब्यात घेतले.लोणार तालुका व शहर काँग्रेस समितीच्या वतीने आज केंद्र शासनाच्या दडपशाही विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी लोणार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
हेही वाचा >>>महाविकास आघाडी, युवा ग्रॅज्युएट दोन जागांवर विजयी; नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणुकीत मतविभाजनाचा फटका
लोणार तालुकाध्यक्ष राजेश मापारी व शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये सेवादलचे प्रकाश धुमाळ, ज्येष्ठ नेते शांतीलाल गुगलीया, साहेबराव पाटोळे, उपनगराध्यक्ष बादशाहखान, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन खरात, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिकेत मापारी, आरोग्य सभापती संतोष मापारी, रामचंद्र कोचर, माजी नगरसेवक पंढरी चाटे, नगरसेवक शेख असलम शेख कासम, तोसिफ कुरेशी ,माजीद कुरेशी, एनएसयुआयचे जिल्हा सरचिटणीस शेख जुनेद शेख करामत, अंबादास इंगळे, आप्पा रामा शिंदे, शुभम चाटे सहभागी झाले.