नागपूर : शहरात १२ वर्षाहून अधिक काळापासून चोवीस तास पाणी पुरवठा योजनेवर काम सुरू आहे, परंतु २४ तास तर सोडख अनेक भागात केवळ १-२ तास  आणि कमी दाबाने पाणी पुरवठा जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात ही अवस्था असल्याने सर्वत्र टीका होत आहे.

यासंदर्भात गडकरी यांनी दोन आठवड्यापूर्वी बैठक घेतली आणि २४ तास पाणी पुरवठा करण्याची जवाबदारी असलेल्या आरेंज सिटी वॉटर वर्क कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर कंपनीने हालचाली सुरू केल्या.

शहरात जलवाहिनीचे शेकडो किमी जाळे पसरले आहे. त्यात गळती किंवा अन्य कुठलाही अडथळा उद्भवला तर त्याचा शोध घेणे आव्हानात्मक होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील पाणी पुरवठ्याच्या मुद्द्यावरून महापालिका आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घरल्यानंतर दोन्ही यंत्रणा सतर्क झाल्या आहे. शहरातील नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा किंवा कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी जलवाहिन्यांमध्ये सूक्ष्म तपासणी करण्यासाठी ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’ तंत्रज्ञानाधारित यंत्रणा बसविण्यात आली आहे.

कित्येकदा पाईपमध्ये कचरा किंवा गाळ साचल्याने पाण्याचा दाब कमी होतो. हे कॅमेरे अडथळे शोधून ते दूर करण्यास मदत करतात. ज्यामुळे घरापर्यंत योग्य दाबाने पाणी पोहोचविणे सोपे होते. जलवाहिनीला जोडलेल्या अनधिकृत जोडण्यांचा देखील हे कॅमेरे शोधतात. त्यामुळे अनधिकृत जोडण्या हटविण्यात मदत होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’द्वारे शहराच्या गजबजलेल्या रस्त्यांखालून टाकलेल्या जलवाहिनीमधील अडथळे शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येत आहे. नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा किंवा कमी दाबाने येणाऱ्या पाण्याची समस्या उद्भवत असल्यास ‘पुशकॅम’ आणि ‘रोबोकॅम’ जलवाहिनींमध्ये सूक्ष्म तपासणी करण्यात येत आहे. एन्डो ९० रोबोकॅम, स्मॉल पुशकॅम आणि बिग पुशकॅम हे ९० मिमी व्यासाच्या चिंचोळ्या पाईपपासून तर २५० मिमी व्यासाच्या मोठ्या पाईपमध्येही करडी नजर फिरवून अडथळे शोधून काढतात. एन्डो ९० रोबोकॅम, स्मॉल पुशकॅम आणि बिग पुशकॅम यांचे अत्याधुनिक सेन्सर पाईपच्या आतल्या प्रत्येक इंचाची तपासणी करतात. अगदी बारीकसा दोषही ते सहजपणे शोधून काढतात. या उपकरणांमुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या समस्या आता समोर येत आहेत.