सध्या काँग्रेस पक्षात ‘काँग्रेस छोडो’ कार्यक्रम सुरू आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी त्यावर लक्ष देत ‘भारत जोडो’ऐवजी सर्वप्रथम काँग्रेस सोडून जाणाऱ्यांना जोडावे, अशी टीका राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली.

हेही वाचा >>>नागपूर : सायबर गुन्ह्यांबाबत आता घरूनच करा तक्रार !

महसूल मंत्री विखे पाटील विविध विकासकामांच्या भूमिपूजनाकरिता गोंदिया जिल्ह्यात आले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सर्व नेते सरकार गेल्याने वैफल्यग्रस्त असून उलटसुलट आरोप करीत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने आता जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण आता जनतेच्या हिताची कामे करणारे सरकार राज्यात आणि केंद्रात आहे.

हेही वाचा >>>नागपूर : अजित पारसेने पोस्ट केलेली छायाचित्रे दिसेनात !, फेसबुकवर अनेकांनी केले ‘अनफ्रेंड’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय हा पक्षश्रेष्ठींचा असतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितल्यानुसार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असेही विखे पाटील यांनी सांगितले.