यवतमाळ : येथील मैथिलीनगरात सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी करीत एका महिलेसह तरुणाला ताब्यात घेतले. सचिन कावरे (३५, रा. पिंपळगाव), योगिता (३९), अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

मैथिलीनगरातील एका घरात कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून एक बनावट ग्राहक तयार करून त्याला मैथिलीनगरात कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेकडे पाठविण्यात आले. बनावट ग्राहकाने इशारा करताच पथकाने छापा टाकला. यावेळी दुमजली घराच्या खालच्या मजल्यावरील एका बेडरूममध्ये ग्राहकासह एक महिला सापडली. तसेच घराच्या वरच्या मजल्यावर सचिन व योगिता हे दोघे आढळले.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Dhokli village, Illegal building Dhokli village,
कल्याणमध्ये ढोकळी गावात शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त, आय प्रभागाची कारवाई
nashik crime news , nashik crime branch police marathi news
नाशिक: सुरगाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर छापा
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

हेही वाचा – अकोला : ज्वारी, बाजरी व मक्याची हमीभावाने खरेदी होणार

कुंटणखाना चालविणाऱ्या योगिताची अंगझडती घेतली असता, तिच्याकडून बनावट ग्राहकाने दिलेल्या पाचशे रुपयांच्या तीन नोटा व रोख एक हजार २०० रुपये, असे दोन हजार ७० रुपये, एक मोबाईल, सचिनकडे रोख ७६० रुपये, एक मोबाईल, दुचाकी तर बनावट ग्राहकासोबत आढळलेल्या महिलेकडे पाचशे रुपये व मोबाईल असा एकूण ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हेही वाचा – अमरावतीत सोनेरी मिठाईची चर्चा, यंदा फराळात १० ते १५ टक्के दरवाढ

महिलेसह तरुणाविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, सहायक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, बंडू डांगे, सय्यद साजिद, रुपेश पाली, रितुराज मेडवे, अरुणा भोयर, ममता देवतळे आदींनी केली.