रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या मागणीला दाद देत रेल्वे प्रशासनाने पांढुर्णा स्थानकावर काही गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी असून प्रवाशांच्या प्रतिसाद बघून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
पांढुर्णा येथे कोरबा- अमृतसर एक्सप्रेस ( गाडी क्रमांक १८२३७), अमृतसर – बिलासपूर एक्सप्रेस (१८२३८), बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस (२०८४३), भगत की कोठी – बिलासपूर एक्सप्रेस (२०८४४),गोरखपूर – कोचुवेल्ली एक्सप्रेस (१२५११) आणि कोचुवेल्ली – गोरखपूर एक्स्प्रेस (१२५१२)ला थांबा देण्यात आला आहे.




हेही वाचा >>> गोरेवाड्यातील ‘ते’ अनाथ बछडे आईच्या प्रतीक्षेत आजारी
कोरबा- अमृतसर एक्सप्रेस ( गाडी क्रमांक १८२३७)पांढुर्णा येथे रात्री ११.४३ वाजता येईल आणि ११.४५ वाजता सुटेल. अमृतसर – बिलासपूर एक्सप्रेस (१८२३८) पांढुर्णा येथे रात्री ११.२३ वाजता येईल आणि ११.२५ वाजता सुटेल. बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस (२०८४३) पांढुर्णा येथे रात्री २.४८ वाजता येईल आणि रात्री २.५० वाजता सुटेल. भगत की कोटी – बिलासपूर एक्सप्रेस (२०८४४)पांढुर्णा येथे रात्री १२.२८ वाजता येईल आणि रात्री १२.३० वाजता सुटेल. गोरखपूर – कोचुवेल्ली एक्सप्रेस (१२५११) पांढुर्णा येथे दुपारी १.५० वाजता येईल आणि दुपारी १.५२ वाजता सुटेल. कोचुवेल्ली – गोरखपूर एक्स्प्रेस (१२५१२) पांढुर्णा येथे सायंकाळी ५.५३ वाजता येईल आणि ५.५५ वाजता सुटेल.