नागपूर : महाराष्ट्रात काळ्या बिबट्याचे अस्तित्व दुर्मिळच. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प त्याबाबतीत सुदैवी ठरले. गेल्या पावणेदोन वर्षांपासून या काळ्या बिबट्याने या व्याघ्रप्रकल्पात ठाण मांडले. मात्र, व्याघ्रप्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना निसर्गाचे हे देणे सांभाळता आले नाही आणि शिकाऱ्यांनी नव्हे तर गावकऱ्यांनी त्याचा बळी घेतला.

जुलै २०२१ मध्ये नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्रात काळ्या बिबट्याच्या अधिवासाचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित झाले. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वर ते प्रसिद्ध केले. त्यानंतर काळ्या बिबट्याच्या आगमनाची वार्ता जगजाहीर झाली. प्रत्यक्षात तीन महिन्यापूर्वीच, म्हणजे एप्रिल २०२१ मध्येच व्यवस्थापनाने समाजमाध्यमावर ते जाहीर केले होते आणि लगेच ते काढूनही टाकले. डॉ. बिलाल हबीब यांनी ते छायाचित्र ‘ट्विटर’वर प्रकाशित केल्यानंतर व्यवस्थापनाने ही बाब मान्य केली. यापूर्वी २०१९ मध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, तर २०२० मध्ये पेंच व्याघ्रप्रकल्पात काळा बिबट आढळून आला.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
trees in Mumbai being killed by poison
पूर्व द्रुतगती मार्गावरील ५० झाडांवर विषप्रयोग; पालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर

हेही वाचा – अंबाझरी उद्यान विकास प्रकल्पाचे लवकरच भूमिपूजन; गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा. लिमिटेडचे संचालक नरेंद्र जिचकार यांची माहिती

हेही वाचा – “सरकार तुमचेच, जुनी पेन्शन तत्काळ लागू करा”; आमदार अडबाले यांचे राज्य सरकारला आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटातही काळ्या बिबट्याची नोंद आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात आढळलेल्या दुर्मिळ काळ्या बिबट्याचे येथील वास्तव्य काहींना कदाचित आवडले नाही. त्यांनी त्याच्यासाठी फास लावला आणि तो बिबट त्या फासात अडकला. त्याने फासातून स्वत:ला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. दुसरीकडे फासात अडकूनही तो मरण पावला नाही म्हणून गावकऱ्यांनी अक्षरश: त्याला भाल्याने मारले आणि त्याने जीव सोडला. १३ जानेवारीलाच ही घटना घडली. तत्पूर्वी १२ जानेवारीला कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आढळले होते. त्याच्या शिकारीची कुणकुण वनरक्षक व स्थानिकांना होती, पण कुणीही त्याच्या शिकारीबाबत अवाक्षर काढले नाही. दुसरीकडे खात्यातीलच एका अधिकाऱ्याने या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. त्याचे कौतुक करणे तर दूरच, पण काळ्या बिबट्याच्या शिकारीचे वास्तव वनखात्यातील वरिष्ठ अधिकारी अजूनही मानायला तयार नाही.