नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राद्वारे शुक्रवारी नागपुरातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘जय श्रीराम’, ‘जय हनुमान’, ‘जय माता दी’ असे धार्मिक नारे लागल्याची माहिती समोर येत आहे.

आरोग्य विद्यापीठाच्या नागपूर विभागीय केंद्राद्वारे आरोग्य आणि अवयवदानाचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याचे मुख्य अतिथी भाजपाचे आमदार मोहन मते आणि जिल्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील अधिष्ठाता होते. भट सभागृहात जिल्यातील विविध वैद्यकीय, आयुर्वेद, दंत, होमियोपॅथी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले होते.

हेही वाचा – यवतमाळ : भरधाव ट्रकची ऑटोला धडक, भीषण अपघातात मायलेकी ठार

हेही वाचा – वर्धा : ग्रामीण भागातही क्रिकेट बेटिंगची चटक; सहा ओव्हरला पाच हजार रुपये, तर दहास..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यक्रमपूर्वी एक जनजागृतीपर रॅली काढली गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांना भट सभागृहात प्रवेश देतांना येथे धार्मिक संगीत लावले गेले. त्यात श्री रामाचे नाव येताच उपस्थितांकडून जय श्रीराम, जय हनुमान असे नारे लागत असल्याची माहिती उपस्थितांनी दिली. या शैक्षणिक व जनजागृतीपर कार्यक्रमात लागलेल्या धार्मिक नाऱ्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.