नागपूर : नागपूरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील दोन यंत्रणा अनुक्रमे मेट्रो आणि शहर बस यांच्यात प्रवासी मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. प्रवासी मिळावे म्हणून मेट्रोच्या मार्गावरील शहर बस बंद कराव्या ही महामेट्रोची विनंती महापालिकेने साफ फेटाळून लावली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेला पुरेसे प्रवासी मिळावे म्हणून मेट्रोच्या मार्गावरील शहर बससेवा बंद करावी ही महामेट्रोने केलेली विनंती नागपूर महापालिकेने अमान्य केली आहे. मेट्रोच्या स्थापनेपासून मेट्रोने मागितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करणाऱ्या महापालिकेने प्रथमच थेट नकार कळवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा – वर्धेत दहावीच्या विद्यार्थ्याजवळ प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स आढळल्याची चर्चा; पण, शिक्षणाधिकारी म्हणतात…

हेही वाचा – कसब्यातील पराभवावरून सुषमा अंधारेंची भाजपावर टीका; “शिवसेनेसोबत बेईमानी केल्यानेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रो प्रकल्पावर जशी गडकरी यांची कृपा आहे, तशीच महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदे-फडणवीस नियंत्रण आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रस्तावाला महापालिकेने नकार देणे याचा अर्थ राज्य सरकारने नकार देणे, असा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जात आहे.