चंद्रपूर : जन्माला येणाऱ्याला मृत्यू अटळ असतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत समाजात जगताना सामाजिक दायित्व अनेक आहेत. मात्र, मृत्यूनंतरही सामाजिक दायित्वाच्या भावनेने समाजाला देणारे क्वचितच आढळतात. चिमूर तालुक्यातील साठगावच्या महिला उपसरपंचांनी पतीसह मृत्यूनंतर अवयव तथा देहदानाचा संकल्प केला. मरणानंतरही आम्ही जिंवत राहून जग पाहू असा निर्धार त्यांनी केला आहे.

जगात अनेकांची विविध व्याधी, अपघाताने शारीरिक हानी होऊन किडणी, लिव्हर, डोळे, हृदय तथा अन्य अवयव निकामी होतात. राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या अहवालानुसार योग्य वेळेवर अवयव न मिळाल्याने दररोज १७ तर वर्षातून ५ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. भारतात दरवर्षी ५ लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज असते. यापैकी योग्य वेळेवर लिव्हर न मिळाल्याने २ लाख रुग्णांचा मृत्यू होतो. मेंदू मृत झालेल्या व्यक्तीच्या हृदय, यकृत, किडनी, स्वादुपिंड, कॅर्निया, फुफ्फुस, त्वचा, हाड आणि आतडे इत्यादी अवयवदानातून अनेक व्यक्तींचे प्राण वाचविता येतात.

Kalmana, murder,
नागपूर : वडिलांनी सांगितले जाऊ नको, त्याने ऐकले नाही, अखेर… दगडाने ठेचून…
Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
A youth from Nalasopara committed suicide by consuming poison due to cyber fraud
सायबर भामट्यांनी घातला २ लाखांचा गंडा; वडील रागावतील म्हणून मुलाची आत्महत्या
married woman murder her son
सोलापूर : लग्नापूर्वीचे प्रेमप्रकरण उजेडात येऊ नये म्हणून विवाहितेने केला मुलाचा खून अन् स्वतः केले विषप्राशन

हेही वाचा – सप्टेंबरमध्ये मुसळधार, ‘आता ऑक्टोबर हिट’साठी तयार रहा

हेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अलर्ट

देहदान केल्यावर साधारणपणे दहा शिकाऊ डॉक्टरांचे प्रशिक्षण संशोधन अवलंबून असते. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून नेहमी सामाजिक कामात हिरहिरीने भाग घेणाऱ्या साठगाव येथील महिला उपसरंपच प्रिती प्रवीण दिडमुठे यांनी मरणोत्तर देहदान करण्याचा निर्धार केला. तशी माहिती पतीस दिली. पतीने यास आनंदाने सहमती देऊन स्वतःही देहदान करण्याचे ठरविले.