नागपूर : देशभरातील एटीएम फोडण्यात ‘एक्सपर्ट’ असलेली पंजाबमधील टोळी विमानाने नागपुरात येत होती. मोठ्या हॉटेलमध्ये थांबून टेहळणी करून एटीएम फोडत होती. नागपुरात एक एटीएम फोडण्याचा डाव फसल्यानंतर गुन्हे शाखा पोलिसांनी त्या टोळीला पंजाबमधून अटक केली.

गुरमीत ऊर्फ समरज्योत संतोखसिंह (जलालाबाद, पंजाब) आणि सुखदेव सिंह पुरण सिंह (फिरोजपूर, पंजाब) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर जुगाद सिंह (मोहाली, पंजाब) हा अद्याप फरार आहे.

हेही वाचा – औषध निरीक्षक पदाची भरती दीड वर्षांपासून रखडली

गेल्या ३० मार्चला जरीपटक्यातील महात्मा गांधी शाळेजवळ असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मध्यरात्रीनंतर आरोपींना कुणाचीतरी चाहूल लागल्याने एटीएम फोडतानाच आरोपींनी पळ काढला होता. सुदैवाने एटीएममधील रक्कम सुरक्षित होती. याप्रकरणी बँक कर्मचारी सैयद अली यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हे शाखेने या घटनेचा छडा लावला. सीसीटीव्ही फुटेजवरून पंजाबमधील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा – नागपूर: आराखडा तयार नसताना नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी? अजित पवार यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाबचे तीन आरोपी मानकापुरातील हॉटेल ताज पँलेसमध्ये थांबले होते. ते तिघेही विमानाने पंजाबला गेले होते. पोलिसांनी गुरुमित सिंह आणि सुखदेव सिंह या दोघांना पंजाबमधून अटक केली. तर तिसरा साथिदार जुगाद सिंह याचा शोध सुरू आहेत.