अकोला : कृषी विभागाच्या योजनांसंदर्भात समाजमाध्यमांवर अफवांचे पीक आले आहे. ‘महाडिबीटी पाेर्टल’वर दोन ते तीन महिने अर्ज भरवण्याची व सोडत होणार नसल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. ती माहिती चुकीची असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याची व सोडत १५ मेपर्यंत असल्याचे तसेच १५ मे नंतर जवळपास दोन ते तीन महिने ऑनलाईन शेतकरी निवड सोडत होणार नाही, अशा आशयाचा संदेश विविध समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

हेही वाचा – VIDEO: ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा चित्रपट…”

‘महाडिबीटी पोर्टल’ संदर्भात अशा प्रकारचा कोणताही संदेश किंवा माहिती कृषी विभागामार्फत देण्यात आलेली नाही. ‘महाडिबीटी पोर्टल’ या संगणकीय ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून अर्ज केलेल्या घटकांची सोडत शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जानुसार व आवश्यकतेनुसार दर आठवड्याला काढण्यात येते.

हेही वाचा – वर्धा ते नांदेड रेल्वेमार्गाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे, अवघ्या चार तासात..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतकरी योजना या सदराखाली जाऊन विविध लाभाच्या घटकांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. तसेच शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाद्वारे करण्यात आले आहे.