नागपूर : ‘मास्टरब्लास्टर’ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील वाघांच्या प्रेमात तर पडलाच, पण तो आता ‘बर्डमॅन’ अशी ओळख असणाऱ्या ताडोबातील सुमेध वाघमारेच्यादेखील प्रेमात पडला आहे. पाच जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिन होता आणि यानिमित्ताने सचिनने ‘एक्स’वर त्या दोघांची चित्रफीत शेअर केली.

भारतात सुंदर आणि वैविध्यपूर्ण वन्यजीव आहेत. पक्षी आणि प्राण्यांबद्दल, त्यांच्या जवळ राहणाऱ्या लोकांकडून ऐकणे आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य समर्पित करणे, ही एक मेजवानी आहे. बर्डमॅन सुमेध वाघमारे यांनी “मेरी आवाज ही पहले है” ही ओळ साकारली आहे, असे सांगून सचिनने सुमेधसोबत साधलेल्या उल्लेखनीय संवादाची चित्रफीत सामायिक केली आहे. यात सुमेधने विविध पक्ष्यांच्या आवाजाची ‘सिम्फनी’ उलगडून दाखवली आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘एम्स’मध्ये टाकाऊ बाटल्या, टायर, साहित्यांनी फुलवले सौंदर्य.. सेल्फी पाॅईंट सर्वांचे आकर्षण

हेही वाचा – दीडशे लाख कोटींचे कर्ज; तरीही भारत आर्थिक महासत्ता होणार, केंद्रीय मंत्र्यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या विविध आवाजांची नक्कल करण्याबाबत सुमेधमध्ये अद्वितीय प्रतिभा आहे. व्याघ्रदर्शानंतर रिसॉर्टवर परतताना सचिन आणि सुमेधची भेट झाली. त्याचे कौतुक करत त्याला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याचा आवाज काढण्याची विनंती केली. यानंतर सचिनला राहावले नाही आणि रानकोंबडी, कोकिळा तसेच वाघ, बिबट आसपास असल्यानंतर सांबर, माकड एकमेकांना जागरुक करण्यासाठी काढत असलेले आवाज, अशा एकापेक्षा एक आवाजाची मेजवानी सुमेधने सचिनला दिली. आपल्या ट्विटमध्ये सचिन तेंडुलकरने भारतातील सुंदर आणि वैविध्यपूर्ण वन्यजीवांबाबत अभिमान व्यक्त केला आहे.