चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात यावर्षी सलग तिसऱ्यांदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व मित्रांसह दाखल झाला आहे. गुरूवारी सायंकाळच्या सफारीत सचिनला तारा, बबली,बिजली आणि युवराजने सलामी दिली.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली सह काही मित्रांसोबत गुरूवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास  नागपूर मार्गे ताडोबात पर्यटन सफारीकरिता दाखल झाले. ताडोबात दाखल झाल्यानंतर ते सर्वप्रथम बांबू रिसॉर्ट मध्ये थांबले. काही वेळ थांबून त्यांनी सायंकाळची सफारी कोलरा गेटद्वारे केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Konkona Sen Sharma Amol Parashar Dating rumors
घटस्फोटानंतर सात वर्षांनी लहान अभिनेत्याला डेट करतेय बॉलीवूड अभिनेत्री, पहिल्या पतीने पोस्ट शेअर करत लिहिलं…
Ruturaj Gaikwad's second century in IPL
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Dinesh Karthik makes history against KKR Match
KKR vs RCB : ३८ वर्षीय दिनेश कार्तिकने रचला इतिहास, IPL मध्ये ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला तिसरा खेळाडू
Arushi Sharma Married to Casting Director vaibhav vishant
कार्तिक आर्यनच्या हिरोइनने गुपचूप उरकलं लग्न, सुप्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहे पती, फोटो आले समोर

सचिन तीन दिवस ताडोबात मुक्कामी असणार आहेत.  या तीन दिवसात सचिन ताडोबात वेगवेगळ्या गेटव्दारे सफारी करतील. ताडोबात आल्यानंतर सायंकाळी त्यांनी कोलारा गेटद्वारे पहिली सफारी आटोपली. साडेतीनच्या सुमारास कोअर झोन मधील कोलारा गेटद्वारे कोअर झोन मध्ये प्रवेश केला. 

हेही वाचा… दीक्षाभूमीचे दर्शन घेऊन काँग्रेस लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची माहिती

पहिल्याच सफारीत कोलाराचे विशेष आकर्षण असलेले तारा, बबली,बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. बबली आणि बिजलीचे बछड्यासह दर्शन झाले. तारा, बबली, बिजली आणि युवराजच्या दर्शनाने सचिन पत्नी चांगलेच भारावले.  सायंकाळी ते उशिरापर्यंत सफारी आटोपुन बांबु रिसॉर्ट मध्ये परतले. सचिनची या वर्षातील ताडोबातील ही तिसरी सफारी आहे. आतापर्यंत त्यांच्या सहा सफारी झाली आहे. विशेष म्हणजे सचिनला माया वाघिणीचे आकर्षण आहे. परंतू यावेळी सचिनला माया वाघिणी दिसली नाही. माया वाघिणीचा निमढेला, अलिझंजा आणि नवेगाव क्षेत्रात अधिवास होता. त्यामुळे प्रत्येकवेळी ती सचिनला दर्शन द्यायची. मायाचे दर्शन झाल्याशिवाय सचिनची पर्यटन सफारी अपूर्ण असायची. पण यावेळी मात्र त्यांना खरचं मायाचे दर्शन होणार नाही. कारण काही महिन्यापासून माया  ताडोबात दिसेनाशी झाली आहे. ताडोबाची क्वीन असलेली माया वाघिणीच्या फक्त आठवणी उरल्या आहेत. मायाच्या न दिसण्याचे सचिनची सफारी यावेळी अपूर्णच राहणार आहे.