scorecardresearch

Premium

“आमच्या भाषेविषयी शंका असणाऱ्यांनी मराठी….”; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला

“महाराष्ट्रद्रोही लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut on contesting elections together with congress in Goa
संजय राऊत (प्रातिनिधिक छायाचित्र)

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या नागपुरात आहेत. त्यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय, “मला जे काही जाहीर करायचं असेल ते मी नागपूरमध्ये येऊनच जाहीर करेन. मी दोन वर्षांनी अधिवेशन काळानंतर नागपूरला आलो आहे. या दोन वर्षांत नागपुरात खूप काही बदल झाला आहे. करोना काळात मी येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय. येत्या काळात निवडणुका वगैरे आहेच, पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला इथं यावे लागणार आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

“देशात असे *** फार आहेत,” उद्धव ठाकरेंनी सोनियांची परवानगी घेतलीये का? विचारणाऱ्या सोमय्यांवर राऊत संतापले

Neelam Gorhe tribute to Manohar Joshi
मराठी भाषा, हिंदुत्व आणि विकासासाठी झटलेले नेतृत्व हरपले, नीलम गोऱ्हे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
ajit pawar jitendra awhad (1)
“संसदेत भाषणाची वेळ आली की अजित पवार बाथरूममध्ये जाऊन…”, जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
Arvind Jagtap Post Viral
“घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या लोकांना….”, लेखक अरविंद जगताप यांची सूचक पोस्ट चर्चेत
Special Menu For Uddhav Thackeray Meal
“पुरणपोळी, ओल्या काजूची उसळ, मोदक आणि…”, उद्धव ठाकरेंसाठी राजन साळवींच्या घरी खास बेत

गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. यावर संजय राऊतांनी पलटवार देखील केला. परंतु यातच त्यांनी दोन-तीन वेळा किरीट सोमय्यांना शिवी दिली होती. यावरून किरीट सोमय्यांसह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी नाराजी व्यक्त करत ही भाषा योग्य नसल्याचं म्हटलं होतं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, “महाराष्ट्रात एखादा पक्ष राज्याची सतत बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेल तर त्याची आरती करावी, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊतांनी शिवी दिल्यासंबंधी विचारलं असता सोमय्या म्हणाले; “माझ्या आईला संताप नको, एकदाच काय ते…”

याशिवाय महाराष्ट्रातल्या लोकांना कुणीही मराठी शिकवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. “चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल, तर लोकशाहीत नक्कीच त्याचं स्वागत व्हायला पाहिजे. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही,” असंही ते म्हणाले.

पोलीस ठाण्यात जबाब नोंदवल्यावर किरीट सोमय्यांचा इशारा; म्हणाले, “उद्या पत्रकार परिषद घेऊन…”

“जे महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी आहेत, ज्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राविषयी कायम द्वेष आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं, असं आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. ‘हजारो मारावे एक उरावा,’ अशा पध्दतीचं राजकारण काही भाजपाचे नेते करीत आहेत. अशा लोकांसाठी शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut slams bjp over targeting him for abusive language for kirit somayya hrc

First published on: 21-02-2022 at 08:39 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×