जुन्या पेन्शनसाठी शिक्षक संपावर गेल्याने अनेक शाळा बंद आहेत. मात्र, शिक्षक संपावर गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चिमूर तालुक्यातील आंबोली ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. सरपंच शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे यांच्यासह उच्चशिक्षित विद्यार्थी शाळा सुरू करीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देत शिक्षकांची भूमिका पार पाडत आहेत.

हेही वाचा >>>बुलढाणा: वडिलांबद्दल आक्षेपार्ह ‘पोस्ट’, काँग्रेस जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची भाजप कार्यकर्त्याला मारहाण

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Telangana school attacked over saffron clothing row
विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड, गुन्हा दाखल
Career MPSC exam Guidance UPSC job
प्रवेशाची तयारी: व्यवस्थापन शिक्षणासाठी राज्यस्तरीय सीईटी
Two minor girls molested in a private tutoring class in nashik
नाशिक : खासगी शिकवणी वर्गात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील आंबोली हे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात वर्ग पहिला ते सातवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत अडीचशे विद्यार्थी आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकसुद्धा संपावर गेले आहेत. या संपामध्ये जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी सहभाग घेतल्याने अनेक ग्रामीण भागातील शाळा बंद झाल्या आहेत. चिमूर तालुक्यातील आंबोली येथील शाळा देखील बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांची गावात भटकंती सुरू होती.

हेही वाचा >>>वर्धा : महाविकास आघाडी आता जनतेच्या न्यायालयात विभागनिहाय जाहीर सभांचे नियोजन

ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेत गावातीलच उच्च शिक्षित युवकांची सभा घेतली. सरपंच शालिनी दोतरे व उपसरपंच वैभव ठाकरे यांनी जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मिटत नाही तोपर्यंत सर्वांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे द्यावे व आपला अमूल्य वेळ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी द्यावा, अशी संकल्पना सर्व उच्चशिक्षित युवकांसमोर मांडली. यावेळी गावातील उच्चशिक्षित युवक हा प्रस्ताव स्वीकारत आनंदाने विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. विद्यार्थ्यांसाठी सरपंच शालिनी दोतरे, उपसरपंच वैभव ठाकरे सह गावातील उच्चशिक्षित युवक गुरुजी बनले आहेत.