नागपूर : गवती कुरणांवर गेल्या दोन दशकांपासून अभ्यास करणारे आणि ‘ग्रासमॅन’ अशी ओळख असलेले प्रा. गजानन मुरतकर यांनी नामिबियातील चित्त्यांसाठी भारतात अधिवास तयार केला आहे. २०१३ ते २०१९ असे सलग सात वर्षे त्यांनी मध्यप्रदेशातील कुनो पालपूर जंगलात व्याघ्र प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चित्त्यांसाठी कुरणक्षेत्र तयार केले.

देशातील १४ पेक्षा अधिक राज्यांमध्ये प्रा. मुरतकर यांनी यशस्वीरीत्या गवती कुरण तयार केले आहे. देहरादूनची भारतीय वन्यजीव संस्था व इतर संस्थांनी तिन्ही ऋतूंमध्ये कुनोचे वातावरण चित्त्यांसाठी अनुकूल असल्याचा अहवाल दिला. दक्षिण अफ्रिकेतील जंगलाशी हा परिसर मिळताजुळता आहे. मात्र, बोरीचे काटेरी वृक्ष असल्याने याठिकाणी कुरणक्षेत्र तयार करणे हे  आव्हान होते. गवा वगळता सर्व तृणभक्षी प्राणी याठिकाणी आहेत. त्यामुळे आधी बोरीची संपूर्ण झाडे येथून काढावी लागली, असे प्रा.  मुरतकर यांनी  सांगितले.  याठिकाणी चित्ता येथे स्थिरावणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!