नागपूर : स्मार्टसिटीतंर्गत शहरात सुरू असलेल्या विकास कामात शापूरजी पालोनजी प्रा. लिमिटेड या कंपनीने कामात दिरंगाई आणि वेळकाढू धोरण अवलंबल्याने विकास कामातून या कंपनीला वगळण्यात आले आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या बैठक झाली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> बुलढाणा : कारवाईनंतर २४ तासातच दंडाची शिक्षा; हॉटेल्स चालक व मद्यपींना मद्यपान पडले महागात

नागपूर स्मार्ट सिटीतर्फे पूर्व नागपुरातील पारडी, भांडेवाडी, पूनापूर आणि भारतवाडा भागात १,७३० एकरमध्ये टेंडर शुअर प्रकल्प अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. या विकासकामांचे कंत्राट शापूरजी पालोनजी कंपनीला देण्यात आले होते. मात्र कंत्राटदाराने आतापर्यंत केवळ १२ किलोमीटर रस्त्याचे काम केले. याबाबत स्मार्ट सिटीचे कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांनी सांगितले की, टेंडर शुअर प्रकल्प अंतर्गत या कंपनीची निवड निविदा प्रक्रियेद्वारे ६५० रुपये कोटींच्या कामासाठी करण्यात आली होती. कंपनीला १० ऑगस्ट २०१८ रोजी कार्यादेश देण्यात आले होते आणि १८ महिन्यात काम पूर्ण करणे अपेक्षित होते. ४९.७६ किमीचे रोड, २८ पूल, ४ पाण्याच्या टाक्या उभारायच्या होत्या. यापैकी फक्त १२.३६ किमी रोड, १० पूल आणि ४ पाण्याच्या टाकीची कामे सुरु आहेत. कंपनीला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. वेळोवेळी मुदतवाढ दिल्यानंतरही कंत्राटदार ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करू शकले नाही. आता कंत्राटदाराने काम पूर्ण करण्यास विविध कारणामुळे असमर्थता दर्शवली व स्मार्ट सिटीवर ४४८.५८ कोटींचा नुकसान भरपाईचा दावा सुद्धा केला. या पार्श्वभूमीवर कंपनीचे कंत्राट बंद करण्यास संचालक मंडळाने मंजुरी प्रदान केली. उर्वरित कामासाठी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे.

हेही वाचा >>> नागपूर : काँग्रेसमध्ये अधिकारांचे विकेंद्रीकरण खालच्या स्तरापर्यंत व्हावे; काँग्रेस नेते शशी थरूर यांची अपेक्षा

पुरस्काराच्या रकमेतून सायकल ट्रॅकचा विकास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज अंतर्गत नागपूर स्मार्ट सिटीला एक कोटीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या निधीचा खर्च सायकल ट्रॅकचा विकास आणि त्यांचासाठी सुविधा उभारण्यासाठी करण्यात येईल, अशी माहिती गोतमारे यांनी दिली.