सरकारने कामाला आता सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेगाने काही निर्णय घेतले आहेत. काही काळ सरकारला काम करु द्या. मग प्रश्न विचारा असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचं कामकाज चालवलं आहे. त्यांना राज्याची स्थिती माहित आहे. काही काळ सरकारला काम करून द्यावं. तसंच त्यांना निर्णयही घेऊन दिले पाहिजेत. त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत, असं राऊत यावेळी म्हणाले. लोकसत्ता ऑनलाइनशी साधलेल्या संवादादरम्यान ते बोलत होते.