शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख विशाल कपले यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना शहरातील जठारपेठ भागात रविवारी रात्री घडली. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.शहरातील जठारपेठ भागात कपले यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी चाकू हल्ला केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ विशाल कपले यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हेही वाचा >>>नागपूर : बच्चू कडू-राणांमधील वाद शमणार की भडकणार ?

या घटनेनंतर खासगी रुग्णालयात शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. विशाल कपले यांच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. हल्लेखोर पसार झाले आहेत. या घटनेचा तपास रामदास पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके करीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.