अमरावतीकर शिव ठाकरे सध्या ‘बिग बॉस १६’ या पर्वामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरामध्ये उत्तम खेळ खेळत शिव ठाकरेने चाहत्‍यांच्‍या अपेक्षा वाढवल्‍या आहेत. शिव ठाकरे हाच यंदाच्‍या पर्वाचा विजेता ठरणार, अशा सदिच्‍छा व्‍यक्‍त केल्‍या जात आहेत. त्‍याच्‍या कुटुंबीयांनी देखील जुन्‍या आठवणींना उजाळा दिला आहे. शिव ठाकरे याच्‍या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. एक वेळ तर त्‍याने घराजवळच्‍या यात्रेत नारळांची विक्रीही केली होती.लहानपणापासून त्‍याला नृत्‍य आणि खेळाची आवड होती. क्रीडा स्‍पर्धेच्‍या आयोजनात तो पुढाकार घ्यायचा. गणेशोत्‍सवाच्‍या काळात अनेक कार्यक्रमांमध्‍ये तो सहभाग घ्‍यायचा, त्‍यातही त्‍याने बक्षिसे मिळवली. यावेळीही तो नक्‍कीच जिंकेल, असा विश्‍वास शिवच्‍या आई आशा ठाकरे यांनी व्‍यक्‍त केला आहे.

हेही वाचा >>>वर्धा: शरद पवारांच्या दौऱ्यावरून वाद; माजी खासदार म्हणतात दौरा यशस्वी होईल, तर…

शिव मूळचा अमरावतीचा आहे. ९ सप्टेंबर १९८९ मध्ये जन्मलेल्या शिवचे संपूर्ण शिक्षण अमरावतीतच झाले. संत कंवरराम विद्यालयातून शिक्षण झाल्यानंतर शिवने जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, नागपूर येथून पदवी घेतली. एमटीव्ही रोडीज रायझिंगमधून त्याने आपला प्रवास सुरू केला. हा एक रिॲलिटी शो होता, ज्यामध्ये शिव ठाकरे रणविजय सिंगच्या टीममध्ये होता.शिव ठाकरेचे वास्‍तव्‍य अमरावतीच्‍या दस्‍तूर नगर भागात होते. याच भागात त्‍याचे बालपण गेले. लहानपणापासून त्‍याला नृत्‍याची आवड होती. गणेशोत्‍सव असो किंवा एखादी यात्रा असो, तो कार्यक्रमांमध्‍ये सहभाग घेत पहिल्‍या क्रमांकाचे पारितोषित घरी आणत होता. क्रिकेटचे सामने तो आयोजित करायचा. महापौरांपासून ते नगसेवकांपर्यंत अनेकांनी त्‍याला प्रोत्‍साहित केले. अभ्‍यासातही तो मागे नव्‍हता. त्‍याला उद्यमशीलता आवडत होती. एकदा तर त्‍याने आपल्‍याला घराजवळच्‍या एका यात्रेत नारळ विकायचे आहेत, असा हट्ट कुटुंबीयांकडे केला. त्‍याने एक गोणी नारळ विकण्‍याचा प्रयत्‍न केला, पण त्‍याला केवळ तीनच नारळ विकता आले, अशी आठवण शिवच्‍या आई आशा मनोहर ठाकरे यांनी सांगितली.

हेही वाचा >>>नागपुरात विक्रमवीर सुनील गावस्‍कर यांच्‍याशी थेट संवाद; क्रिकेटचे अफलातून किस्‍से ऐकण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिव ठाकरे यांने ‘बिग बॉस १६’ मध्‍ये सगळ्यांची मने जिंकली आहेत. शिवची घरातील इतर सदस्यांशी असलेली मैत्रीही प्रचंड लोकप्रिय आहे. आता ‘बिग बॉस १६’ चा फिनाले जवळ आला असून शिव ठाकरेच या पर्वाची ट्रॉफी जिंकणार अशी भावना शिवच्‍या अमरावतीकर चाहत्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.शिव ठाकरे ‘रोडीज’, ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तो बिग बॉस मराठीचा दुसऱ्या पर्वाचा विजेता आहे. टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असलेला शिव ठाकरे लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.