नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्यावतीने रेशीम बागेतील महात्मा फुले सांस्कृतिक भवनात प्रशिक्षण शिबीर झालं. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटावर टीकास्र डागलं होतं. राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही, असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं. यावर शिवसेना ( शिंदे गट ) खासदार कृपाल तुमाने भाष्य केलं आहे.

नेमकं अजित पवार काय म्हणाले?

“राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य झाले नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत,” असा सवाल करून अजित पवारांनी म्हटलं, “गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवलं? काय होईल ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधानपरिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.”

हेही वाचा : शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर मतदारसंघाचा तिढा सुटेना? विलास लांडेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला पुन्हा सुरुवात

“राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही,” असे अजित पवारांनी सांगितलं.

“झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक…”

याबद्दल नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कृपाल तुमाने यांना प्रश्न विचारला. त्यावर तुमाने म्हणाले की, “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी किती खोके जमवले ते सांगावं. खोक्याशिवाय अजित पवार काम करत नव्हते. झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात,” असा गंभीर आरोप तुमाने यांनी अजित पवारांवर केला आहे.

हेही वाचा : सिंधुदुर्गातून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले, “आधीच्या सरकारने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“भाजपा आणि शिवसेना युतीत लढणार”

“आम्ही लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो असून, भाजपा आणि शिवसेना युतीत लढणार आहे. तीन महिन्यांत शिवसेना आणि भाजपाचे संयुक्त मेळावे घेण्यात येणार आहेत,” अशी माहिती कृपाल तुमाने यांनी दिली.